Nashik Rain Crisis : तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने भेगाळलेल्या रानात माना टाकून शेवटचा घटका मोजणारे पिके दोन-तीन दिवसांत हवेने उडून जाईल. कोरडा चारा संपला आहे. पाऊस नसल्याने हिरवा चारा उपलब्ध झाला नाही.
उपलब्ध हिरव्या चाराचे भाव गगनाला भिडले आहे. बळीराजा संकटात सापडलेला दिसून येत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्याचे कैवारी असलेले मायबाप सरकारने दुष्काळ जाहीर करावा, हीच अपेक्षा बाळगून शेतकरी जगत आहे. (Maize millet groundnut and cotton crops started to deteriorate due to lack of rain nashik rain crisis)
जुलैमध्ये थोड्याफार पावसावर पेरण्या झाल्या. त्यानंतर अधूनमधून पडणाऱ्या फवाऱ्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी पिके दमदार होती; मात्र त्यानंतर पावसाला खंड पडल्यामुळे आणि कडक उन्हामुळे पिके करपू लागली. बागायती क्षेत्रात विहिरींनी पूर्ण तळ गाठल्याने आता पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.
तर कोरडवाहू क्षेत्रात वारा वाहू लागल्याने पिके उडून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे. काही ठिकाणी पिकांच्या वाती झाल्या आहेत. जनावरांसाठी चारा म्हणून उभ्या पिकाचे कापणी करून जनावरे कसे जगतील, याकडे शेतकरी पाहत आहेत.
पोटाच्या मुलाप्रमाणे जनावरांना जीव लावत जनावरे जगवले आहेत; पण या पावसाअभावी आता जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी होते म्हणून कांद्याचे उळे टाकलेले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना कांदा लागवड करता येत नाही.
तीन महिने झाले तरी नदी, नाले कोरडेठाक आहेत. शेतात मोठमोठे तडे पडलेले आहेत. पिकांच्या वाती झालेले असून, पाऊस आला तरी पिकांना फायदा होणार नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सरकारने लवकरच दुष्काळ जाहीर करावा व जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात, अशी परिसरातून मागणी होत आहे.
"नांदगाव, चाळीसगाव, मालेगाव तालुक्यांतील गावांना जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी, खरीप हंगाम धोक्यात आल्याने नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकऱ्यांना मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा." - दादा बोरसे, माजी सरपंच, साकोरा
"माझ्याजवळ लहान-मोठे २०० मेंढ्या असून, त्यांच्यावर माझ्या कुटुंबातील सात ते आठ लोकांचा उदरनिर्वाह चालतो. पाणी आणि चारा नसल्यामुळे आमच्यावर मेंढ्या विकण्याची वेळ आली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न आम्हा मेंढपाळांना पडला आहे." - बाप्पू चव्हाण, मेंढपाळ, जामदरी
"शेतकरी आपल्या जनावरांना पोटच्या मुलांप्रमाणे जीव लावतात. शेतात चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही. जनावरे उपाशी ठेवणे शक्य नाही म्हणून विकण्यासाठी न्यावेत, तर तेही कोणी विकत घेत नसल्याने मोठी पंचायत झाली आहे." -दत्तू सुरसे, सारताळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.