Nashik ZP News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियान यशस्वितेसाठी जिल्हा परिषद यंत्रणा कामाला लागली आहे. दोन दिवसांपासून हे अभियान तालुकास्तरावर राबविण्याबाबत सर्व विभागांकडून नियोजन सुरू आहे.
मुख्यालयातील सर्व विभाग अभियान नियोजनातच व्यस्त असल्याचे दिसत आहे. (Majhi Mati Maja Desh Campaign Planning ZP Busy Responsible for all departments nashik)
जिल्ह्यात येत्या ९ ते २० ऑगस्टदरम्यान ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान गाव आणि गटस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, नगरपंचायत तसेच महापालिका क्षेत्रात घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठका घेऊन जिल्हाभर हे अभियान राबविण्याचे आदेश काढले आहेत.
त्याच अनुषगांने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनीदेखील सर्व गटविकास अधिकारी यांसह सर्व यंत्रणेला पत्र काढत अभियान राबविण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
श्रीमती मित्तल यांनी गटविकास अधिकारी यांसह संबंधित सर्व अधिकारी वर्गाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत नियोजन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, शिक्षण यांसह विविध विभागांनाही याची जबाबदारी सोपविली आहे.
त्यामुळे सर्वच विभागांकडून तालुका पातळीवर नियोजनाबाबत पाठपुरावा करण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. सर्वच विभागप्रमुखांकडून त्या-त्या कामांबाबत फॉलोअप घेतला जात आहे.
त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच स्वातंत्र्यदिनाची तयारीदेखील सुरू आहे. जिल्हा परिषदेत नियमित शासकीय कामकाज ठप्प झाले असून, या अभियानाचाच बोलबाला सुरू असल्याचे चित्र आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.