Makar Sankranti 2024: पतंगप्रेमींनी बाजारपेठ फुलली! 2 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत दर

Crowd at the shop to buy kites. In the second photo, a customer is getting manja filled in a spinning wheel by a vendor.
Crowd at the shop to buy kites. In the second photo, a customer is getting manja filled in a spinning wheel by a vendor.esakal
Updated on

जुने नाशिक : अवघ्या काही दिवसांवर मकरसंक्रांत येऊन ठेपली आहे. पतंगांची बाजारपेठ सजली आहे.

विविध प्रकारच्या आकर्षक पतंगी विक्रीस दाखल झाल्या आहेत. पतंगप्रेमींकडून पतंगी खरेदीसाठी गर्दी केली जात असल्याने बाजारपेठ फुलली आहे. (Makar Sankranti 2024 Kite lovers flock to market Rates from Rs 2 to Rs 300 nashik)

सोमवार (ता. १५) मकरसंक्रांत साजरी होणार आहे. तरुण आणि लहान मुलांमध्ये पतंग उडविण्यास घेऊन मकरसंक्रांतीचे आकर्षण वाढले आहे. वेळ मिळेल त्यावेळेस पतंगप्रेमींकडून पतंग उडविण्याचा आनंद घेतला जात आहे.

त्यानिमित्ताने रंगीबेरंगी लहान-मोठी आकर्षक पतंग खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होताना दिसत आहे. जुने नाशिक, रविवार कारंजा अशा मुख्य बाजारांसह विविध ठिकाणी पतंगांचे दुकाने सजली आहेत.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या, तसेच लहान मुलांसाठी कार्टून पतंगीसह सामाजिक संदेश देणाऱ्या पतंगी विक्रीस उपलब्ध झाल्या आहे. एक इंचापासून ४२ इंचाची पतंग विक्रीस दाखल झाल्या आहे.

इतकेच नाही, तर पूजा आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी विशेष प्रकारच्या अतिशय लहान पतंगी आणि फिरकी देखील विक्रीस आल्या आहेत. सध्या पतंग उडविण्याचा जोर दिसून येत आहे.

त्यानिमित्ताने किरकोळ विक्रीसही प्रतिसाद वाढला आहे. त्याचप्रमाणे कॉटन बरेली मैदानी, एसपी बरेली आणि पांडा मांजा, तसेच लहान-मोठ्या फिरकीस मागणी असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

दोन रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत पतंग आणि १२० पासून ते ३५० पर्यंत मांजा विक्री होत आहे. त्याचप्रमाणे दहा ते १६० रुपयांपर्यंत फिरकीची विक्री होत आहे.

Crowd at the shop to buy kites. In the second photo, a customer is getting manja filled in a spinning wheel by a vendor.
Makar Sankranti 2024: यंदा तीळगुळाचे भाव वाढणार! राज्यात झालेल्या अल्पवृष्टीमुळे तिळाच्या उत्पादनात घट

पतंग, मांजाचे प्रकार आणि दर

पतंग प्रकार दर

रामपूर स्पेशल ........... ५ ते २०

धोबी.................५ ते २०

प्लास्टिक कापड पतंग......२ ते ४०

कापड पतंग...........८० ते ३००

(कापडीमधील गरुड, घुबड, बारबी, विमान)

मांजा ..................... दर (रीलमध्ये)

बरेली मदानी..................१५०

एसपी बरेली..................१२०

पांडा नऊतारी..................१५०

पांडा बारातारी..................२५०

पांडा सोळातारी..................३५०

फिरकी.......................१० ते १६०

Crowd at the shop to buy kites. In the second photo, a customer is getting manja filled in a spinning wheel by a vendor.
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला स्नानाचे आणि दानाचे काय आहे महत्व?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()