Nashik News : आरोग्य सेवेसाठी सर्व सोयी, कनेक्टिव्हिटी नाशिकमध्ये असल्याने नाशिकला मेडिकल टुरिझम हब होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्याकडे करण्यात आली आहे. (Make Nashik Medical Tourism Hub Credai Metro demand to Union Health Minister News)
नवी दिल्ली येथे क्रेडाई नाशिक मेट्रो शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमवेत डॉ. मनसुखभाई मांडविया यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी करण्यात आली. नाशिक ड्रायपोर्टला मंजुरी दिल्याबद्दल डॉ. मांडविया यांचे आभार मानले.
मेडिकल टुरिझम क्षेत्रात नाशिकमध्ये मोठ्या संधी आहे. त्यासंदर्भात क्रेडाईकडून सर्वेक्षण अहवाल लवकरच प्रकाशित केला जाणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.
यावेळी नाशिक संदर्भातील जेएलएल या संस्थेचा यापूर्वी तयार करण्यात आलेला सर्वे रिपोर्ट केंद्रीय डॉ. मांडविया यांना सादर करण्यात आला. यात नाशिकमधील शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधीचे तांत्रिकदृष्ट्या सादरीकरण करण्यात आले आहे.
नाशिकला मेडीकल हब झाल्यास त्याचा फायदा राज्याला होणार आहे. मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील महिन्यात नाशिक भेटीची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
नाशिक मेट्रो शिष्टमंडळात माजी अध्यक्ष सुरेश पाटील, क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे समन्वयक अंजन भालोदिया, ऋषिकेश कोते व सचिन चव्हाण यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.