Nashik ZP News: राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान यशस्वी करा : डॉ. अर्जुन गुंडे

Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde. Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi, Accounts and Finance Officer Bhalchandra Chavan along with Department Heads
Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde. Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi, Accounts and Finance Officer Bhalchandra Chavan along with Department Headsesakal
Updated on

Nashik ZP News : बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकीकरणामुळे प्रशासनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्याकरिता, तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविले जात आहे.

प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी आज येथे केले. (Make Rajiv Gandhi Administrative Dynamics Campaign Success Dr Arjun Gunde Nashik ZP News)

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १२) बैठक झाली.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय १ फेब्रुवारी २०२१ च्या अनुषंगाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाच्या कार्यपद्धतीबद्दल डॉ. गुंडे यांनी माहिती देऊन हे सर्व विभागांच्या माध्यमातून कसे राबवता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले.

सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी देखील प्रशासकीय कामकाजात गतिमानता कशी आणता येईल, याबद्दल संकल्पना मांडल्या.

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, बांधकाम तीनच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे, बांधकाम दोनचे कार्यकारी अभियंता पंकज मेतकर यांच्यासह सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde. Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi, Accounts and Finance Officer Bhalchandra Chavan along with Department Heads
Nashik ZP News: जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम पंधरवडा : आशिमा मित्तल

‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानाबद्दल सूचना

शासनाच्या विविध कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांचा एकतृतीयांश कालवधी हा कार्यालात जातो.

या वेळी कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर व पोषक असल्यास त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा फायदा निश्चितपणे प्रशासन आणि सामान्य जनेतला होतो, यास अनुसरून ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येते.

या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत केली जाणार आहे.

याबद्दल देखील डॉ. गुंडे यांनी माहिती देत राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व सुंदर माझे कार्यालय या अभियानाची सांगड घालून काम करण्याच्या सूचना उपस्थितांना केल्या.

Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde. Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi, Accounts and Finance Officer Bhalchandra Chavan along with Department Heads
Narhari Zirwal News: जिल्हा बँकेतील पतसंस्थांच्या ठेवी मिळवण्यासाठी प्रयत्नशील : झिरवाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.