Nashik News : अदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी : शरद आहेर

Agitation News
Agitation Newsesakal
Updated on

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहेरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. अदानी उद्योग समूहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले.

त्यामुळे आता एलआयसीच्या ३९ कोटी गुंतवणूकदारांचा व स्टेट बँकेच्या ४९ कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का? अशी भीती निर्माण झाली असल्याचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले. (Maladministration in Adani Group Should be investigated Loud sloganeering by Congress workers at Gadkari Chowk Nashik News)

Agitation News
Nashik News | सत्यजित तांबेंना भेटण्याचा निरोप आला, आम्ही भेटणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, यासाठी शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. ६) गडकरी चौकातील एलआयसी ऑफिससमोर आंदोलन करण्यात आले.

श्री. आहेर, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, गटनेते शाहू खैरे, उद्धव पवार, बबलू खैरे, विजय पाटील, स्वप्नील पाटील, अण्णा मोरे, शरद बोडके, अनिल बहोत, राजकुमार जेफ, वैभव शेलार, दाऊद शेख, इमरान अन्सारी, पवन भगत, जावेद शेख, जावेद पठाण, अनिल बेग, राजेंद्र सोनवणे, गोपाळशेठ जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Agitation News
Jalgaon News : यात्रेकरूंच्या बसला ओडीसा बॉर्डरजवळ अपघात; जिल्ह्यातील 31 यात्रेकरूंचा समावेश

एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतु मोदी सरकारने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला.

अदानी समूहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

याकडे श्री. आहेर यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही. परंतु खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास पक्षाचा विरोध आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे, असेही त्यांनी आंदोलनावेळी सांगितले.

Agitation News
Jalgaon News : यात्रेकरूंच्या बसला ओडीसा बॉर्डरजवळ अपघात; जिल्ह्यातील 31 यात्रेकरूंचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.