Malegaon Bazar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा पॅनलप्रमुख अद्वय हिरे यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर, उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार या विषयी मोठी उत्सुकता आहे.
दरम्यान, समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीसाठी येत्या २५ मेस सकाळी अकराला मतदान होणार आहे. (Malegaon Bazar Samiti chairman of advay hirey 25 May Poll nashik news)
बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री. हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने १८ पैकी १४ जागांसह निर्विवाद बहुमत मिळविले होते. यामुळे श्री. हिरे यांची सभापतीपदी निवड निश्चित आहे.
उपसभापतीपदी श्री. हिरे ज्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, त्याला सर्व संचालक मान्य करतील, अशी परिस्थिती आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने १५ जागांवर निवडणूक लढविली होती.
त्यापैकी १४ जागांवर त्यांनी दणदणीत यश मिळविले. यात सोसायटी गटाच्या ११ जागांपैकी दहा, तर ग्रामपंचायत गटाच्या चारही जागा मिळविल्या होत्या. पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यात दोन उमेदवार व्यापारी गटात, तर एक उमेदवार सोसायटी गटात विजयी झाला. समितीचे माजी सभापती बंडुकाका बच्छाव यांनी तीन जागांवर उमेदवार दिले होते. त्यातील हमाल मापारी गटात त्यांचा एक समर्थक उमेदवार विजयी झाला.
तर व्यापारी गटातून त्यांच्या दोन्ही उमेदवारांना पराभव स्विकारावा लागला. समितीवर श्री. हिरे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे २५ मेस होणारी सभापती, उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
नवनिर्वाचित संचालकांना २५ मेस होणाऱ्या बैठकीचा मसूदा पाठविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.