मालेगाव ब्लास्ट प्रकरणात ATS वर साक्षीदाराचे खळबळजनक आरोप

Malegaon Blast witness serious allegations over ATS 17th witness change his statement
Malegaon Blast witness serious allegations over ATS 17th witness change his statement esakal
Updated on

आज (दि. ३) मुंबईतील विशेष एनआयए (NIA Court) न्यायालयात मालेगाव ब्लास्ट (Malegaon Blast) खटल्याची सुनावणी झाली. यावेळी अजून एक साक्षीदार (Witness) आपल्या जबाबापासून पलटला. त्याने एटीएस (Anti-Terrorism Squad) वर खळबळजनक आरोप केले. विशेष म्हणजे आतापर्यंत या प्रकणात जवळपास १७ साक्षीदारांनी आपला जबाब बदलला आहे.

Malegaon Blast witness serious allegations over ATS 17th witness change his statement
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ; चव्हाण

आज मुंबईतील विशेष एनआयए (National Investigation Agency) न्यायालयात मालेगाव ब्लास्ट (Malegaon Blast) प्रकरणी हजर असलेला साक्षीदार वेदने आपला जबाब बदलला. "मला एटीएस पोलिसांनी जबरदस्तीने घरातून नेले, तीन ते चार वेळा नेले आणि तीन ते चार दिवस बेकायदेशीर कोठडीत ठेवून मारले. यावेळी केलेल्या मारहाणीत माझा एक कानाला इजा झाली. एके रात्री दोन-तीनच्या सुमारास माझा डोक्याला बंदूक लावून ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला गेला. हे सर्व मला जबरदस्तीने आरएसएस (RSS) संघटनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याचे नाव घेण्यासाठी केले गेले.' असा खळबळजनक आरोप वेदनेने केला.

Malegaon Blast witness serious allegations over ATS 17th witness change his statement
नाशिक : वेतन हवे असेल तर पाणी, घरपट्टी भरा...

तो पुढे म्हणाला की, मी आरएसएस संघटनेचा सदस्य नाही. त्यांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांची नावे मला माहिती नाहीत. तरीही ते मला सतत धमकी देत होते. दरम्यान मालेगाव ब्लास्ट प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दि. ०४ रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.