Nashik News : येथील एसटी बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शहराचा राज्यातील प्रमुख शहरांसह मध्यप्रदेश, गुजरात राज्यांशी व्यापार व उद्योग माध्यमातून व्यापक संपर्क असलेल्या मालेगाव बसस्थानकामध्ये बदलत्या काळानुसार सुविधा नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. (Malegaon bus stand in bad condition Fall of protection wall need of facilities with changing times Nashik News)
मालेगाव शहरात प्रमुख दोन बसस्थानक आहे. दोन्ही बसस्थानकामध्ये इतर तालुके व जिल्ह्यातील येणाऱ्या बसेची मोठी वाहतूक असते. त्यामुळे या ठिकाणाहून हजारोच्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात.
मात्र या दोन्ही बसस्थानकांची आताची स्थिती अतिशय बिकट झालेली आहे. संरक्षक भिंतीची पडझड झालेली आहे. बसस्थानकात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य आहे. सार्वजनिक शौचालयाला उर्किड्याचे स्वरूप आलेले आहे.
मोकाट जनावरांची सतत याठिकाणी वावर असतो. स्वच्छतेसाठी दोन कर्मचाऱ्याच्या भरवशावर साफसफाई होते. आगारातील वर्कशॉपची परिस्थितीही यावेगळी नाही. बसस्थानकावर प्रवासी आसन व्यवस्था पुरेशी नाही. बसण्यासाठी असलेले बेंचही मोडकळीस आले असून प्रवाशांना तासन्तास उभे राहावे लागते.
ज्याप्रमाणे बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. त्याचप्रमाणे येथील प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस देखील जुन्या झालेल्या आहे. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने काही नवीन बस दाखल झाल्या आहेत. मात्र बसेसची संख्या अपुरी असल्याने जुन्या बसेसमधून अनेकदा प्रवासी वाहतूक करण्याची वेळ वाहक आणि चालकांवर आलेली आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या सुविधांची गरज
- बस स्थानकात सिमेंट काँक्रिटीकरण
- सफाई कर्मचारी संख्या वाढवणे.
- आगारास कमीत कमी ३०ते ३५ नवीन बसेस
- वर्कशॉप दुरुस्ती व डागडुजी करावी.
- प्रवासी वाहनतळ व्यवस्था
- बस स्थानक स्वच्छतेसाठी महानगरपालिकेचे सहकार्य
- सुलभ शौचालयांची देखभाल व दुरुस्ती
- रंगरंगोटी, अद्ययावत फलक
- व्यापारी असोसिएशन व सेवाभावी संस्थांचा पुढाकार
आकड्यात बस स्थानक-
बस स्थानक - २
बसेस संख्या- ७०
नवीन बस- १०
नाशिक वर्कशॉपमध्ये पाठवलेल्या बस ८
सफाई कर्मचारी मंजूर ६
कार्यरत सफाई कामगार २
"मालेगावच्या दोन्ही बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. शासनातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याप्रमाणे कार्यवाही करून सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात. एसटीच्या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ होईल. याबाबत एसटी प्रेमींना सोबत घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे." - अतुल लोढा, एसटी व प्रवासी मित्र, मालेगाव
"बस स्थानकाच्या स्वच्छतेसह एकंदरीत बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वाहनतळ बांधकामासह आगार व संरक्षक भिंती दुरुस्ती प्रस्ताव पाठवला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत खासगी कर्मचारी यांचा आधार घेऊन साफसफाई करण्यात येते. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बाबतीत कडक सूचना दिलेल्या आहेत." - मनिषा देवरे, आगार व्यवस्थापक, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.