Malegaon News : LED स्ट्रिपच्या रोषणाईने उजळले शहरातील रस्ते; तिरंगी रोषणाई वेधतेय सर्वांचे लक्ष!

LED strip lighting of streetlights on the old highway at the entrance to the city and  at national integration jogging track
LED strip lighting of streetlights on the old highway at the entrance to the city and at national integration jogging trackesakal
Updated on

मालेगाव : शहरातील विविध भागातील सिमेंटकॉंक्रीट रस्त्यांसाठी शंभर कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. यात मोसम पुलावरील पुलांचे काम देखील होणार आहेत. ही कामे निर्धारित मुदतीत पूर्ण झाल्यास आगामी वर्षात रस्त्यांना झळाळी येणार आहे.

तत्पूर्वी शहरातील पश्‍चिम भागातील चार प्रमुख रस्ते एलईडी स्ट्रिप लायटिंगचे सुशोभीकरण व रोषणाईने उजळून निघाले आहेत. राज्यातील प्रमुख महानगरांच्या धर्तीवर रस्ता दुभाजक दरम्यान असलेल्या पथदीपांना करण्यात आलेली ही तिरंगी रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.(malegaon city road beautification by dada bhuse fund malegaon news)

पालकमंत्री दादा भुसे यांच्या निधीतून अवघ्या दहा लाख रुपयाच्या अल्पखर्चात हे चार प्रमुख रस्ते झळाळून निघाले आहेत. सायंकाळी होणारी रोषणाई यामुळे नेत्रसुखद वाटत आहे. अनेकांना या रोषणाईचे छायाचित्र घेण्याचा व सेल्फी काढण्याचाही मोह होतो.

चार प्रमुख रस्त्यांबरोबरच शहराचे भूषण ठरलेल्या राष्ट्रीय एकात्मता जॉगिंग ट्रॅकवरील आकर्षक पथदीपांना एलईडी स्ट्रिप लायटिंग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथील टी. आर. इलेक्ट्रीकल्स व एंटरप्राइजेसने हे काम केले आहे.

एलईडी स्ट्रिप लायटिंगमुळे शहराचे प्रवेशद्वार असलेला मोतीबाग नाका ते महात्मा फुले पुतळा हा रस्ता झळाळून निघाला आहे. याशिवाय महात्मा गांधी पुतळा ते मोची कॉर्नर, चर्च ते सोमवार बाजार-रावळगाव नाका व महात्मा फुले पुतळा ते सोयगाव कमान गेट अशा चारही प्रमुख रस्त्यांना ही लायटिंग करण्यात आली आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

LED strip lighting of streetlights on the old highway at the entrance to the city and  at national integration jogging track
Nashik News : NMC प्रशासनाचा थकबाकीदारांना नळजोडणी खंडीत करण्याचा इशारा

साठ फुटापेक्षा जास्त रुंदीच्या, मध्यभागी दुभाजक व सेंटर पोल असलेल्या रस्त्यांवर ही रोषणाई उठून दिसते. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या प्रत्येक पथदिपाच्या खांबाला नऊ ते बारा मीटर लांबीची ही स्ट्रीप लायटिंग करण्यात आली आहे.

"हैद्राबाद, वाराणसी यासह राज्यातील मुंबई, नागपूर, नगर, ठाणे, औरंगाबाद या महानगरांच्या धर्तीवर अत्यंत कमी खर्चात ही एलईडी स्ट्रीप रोषणाई करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या कल्पनेतून हे साकारले." - राकेश आहिरे, संचालक, टी. आर. इलेक्ट्रीकल्स ॲन्ड एंटरप्राईजेस

"देशातील विविध प्रमुख महानगरात पथदीपांना, प्रसिद्ध हॉटेल्स, वृक्षवेली, तसेच विविध सण, उत्सव काळात एलईडी स्ट्रिप लायटिंग केली जाते. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांना कायमस्वरूपी झालेली ही लायटिंग शहर सुशोभीकरणाच्या व नव्या कल्पनांच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दर्शविते." - भारत जगताप, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)

एलईडी स्ट्रिप लायटिंग

- एकूण खर्च - १० लाख

- चार प्रमुख रस्त्यांवरील पोलची संख्या - २८५

- मध्यवर्ती पथदीप खांबाला आठ ते दहा मीटर लांबीची रोषणाई

- राष्ट्रीय एकात्मता जॉगिंग ट्रॅकचे सौंदर्य खुलणा

LED strip lighting of streetlights on the old highway at the entrance to the city and  at national integration jogging track
Nashik News : नांदगावचा ऐतिहासिक ठेवा असलेली ‘वेस’ धोक्यात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.