Malegaon Crime: मालेगाव हादरलं! पित्याची सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या

 crime
crimeesakal
Updated on

मालेगाव: तालुक्यातील आघार-ढवळेश्‍वर रस्त्यालगत राहणाऱ्या यशवंत लक्ष्मण हिरे (वय ४२) व त्यांचा लहान मुलगा रुद्र यशवंत हिरे (वय ६) या पिता-पुत्रांनी अजंग शिवारातील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आघार येथील यशवंत हिरे यांचा पशुखाद्यचा व्यवसाय आहे. विशेषत: म्हशींना लागणारे बिअर खाद्य ते घाऊक भावाने घेऊन ग्रामीण भागात त्यांच्या पिकअपमधून किरकोळ विक्रेत्यांना विकतात. आज सकाळी त्यांनी मुलगा रुद्र यालाही बरोबर घेतले. शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरुन बिअर खाद्य घेत ते पिकअपमध्ये भरले.

 crime
Mahad : राजकारणात मोठी उलथापालथ; काँग्रेसला धक्का देत माजी आमदाराची कन्या करणार ठाकरे गटात प्रवेश

अजंग-रावळगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या विहिरीजवळ त्यांची पिकअप उभी होती. विहिरीबाहेर चपलांचे दोन जोड होते. दीर्घकाळ पिकअप उभी असल्याने परिसरातील काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती अजंग येथील पोलिसपाटीलांना दिली. पोलिसपाटीलांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांना सांगितले.

 crime
Sharad Pawar Resigns : शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत सस्पेंस कायम! कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं?

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तातडीने मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे शकील तैराक यांनी प्रथम यशवंत यांचा व नंतर रुद्रचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

यशवंत यांनी मुलगा रुद्रला मिठी मारली होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे आघार व परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत.

वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा होत असून परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.