Nashik Political: मालेगावला महागटबंधन आघाडीत बिघाडी! आमदारांवर स्वपक्षाच्या नगरसेवकांकडून टीका

political news
political newsesakal
Updated on

Nashik Political : शहरात निवडणुका असो किंवा नसो, पाचही वर्षे प्रचार सभा सुरु असतात. यातूनच शहरातील राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोपांचे राळ उडविण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे सध्या टीकेचे धनी झाले आहेत.

त्यांच्या महागटबंधन आघाडीचा मित्र पक्ष असलेल्या जनता दलाचे सर्वेसर्वा मुश्‍तकीम डिग्निटी यांनी त्यांच्यावर विकास कामे न करताच बिले काढल्याची व निष्क्रीय लोकप्रतिनिधी असल्याची टीका केली.

भरीस भर म्हणून आमदारांच्या स्वपक्षाचे नगरसेवक अमीन अन्सारी यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. (Malegaon failed in Mahagatbandhan alliance Criticism of MLAs from independent party corporators Nashik Political)

आजवर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारेच त्यांच्यावर का टीका करू लागले हे अनेकांना न उलगडलेले कोडे आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदारांना तूर्त अडचणीत आणून आपले इप्सित साध्य करून घेण्यासाठीची ही धडपड असल्याचे बोलले जाते.

महानगरपालिका सभागृहात आघाडीत जनता दलाचे कमी नगरसेवक असतानाही महागटबंधन आघाडीचे गटनेते पद मुश्‍तकीम डिग्निटी यांच्या पत्नी शानेहिंद निहाल अहमद यांना देण्यात आले होते.

पाच वर्षाच्या कार्यकाळात सत्तारुढ आघाडीत काही प्रमाणात कुरबुरी झाल्या. मात्र महागटबंधन आघाडी एकसंघ होती. मनपातील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर मात्र आघाडीत चलबिचल सुरु झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

political news
Tomato Rates Hike: टोमॅटोने बनविले चक्क करोडपती, लखपती! डोंगरकुशीत वसलेल्या धुळवडकरांचे कष्ट

मुश्‍तकीम डिग्निटीही विधानसभेसाठी तयारी करीत असल्याची चर्चा सुरु होताच आमदार मौलाना मुफ्ती यांनी त्यांना साइड ट्रॅक करण्यास सुरवात केली. आमदार मौलाना मुफ्ती यांनी डिग्निटी यांनी विकास कामांसाठी निधी घेऊनही कामे केलीच नाही अशी टीका केली.

त्याला प्रत्युत्तर म्हणून डिग्निटी यांनी आमदार निष्क्रीय आहेत. दरेगाव चौफुलीचे सुशोभीकरण यासह अनेक आश्‍वासने देवून ठेवली. एकही भरीव काम केले नाही अशी टिप्पणी केली.

आमदार मौलाना मुफ्ती यांच्यावर स्वपक्षातील नेतेच टीका करीत असताना त्यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार रशीद शेख यांनीही या संधीचा फायदा घेतला. या वादात एमआयएमचे नेते डॉ. खालीद परवेज यांनी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

आमदार मौलाना मुफ्ती यांचे समर्थक त्यांच्यावर टीका करीत असले तरी आमदारांची रसद न मिळाल्यास त्यांची स्थिती बिकट होईल अशी चर्चा आहे. त्यामुळे टीका करून काहीतरी पदरात पाडून घेण्याची भूमिका असावी.

त्यातूनच हे वादळ उठल्याची चर्चा आहे. या आरोप प्रत्यारोपांमुळे शहरवासीयांना चर्चेला एक नवा विषय मिळाला आहे.

political news
Apla Davakhana: मिळकती नावावर नसल्याने ‘आपला दवाखाना’ अडचणीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.