Nashik News : मालेगावी पूर्णवेळ तहसीलदार केव्हा? 5 महिन्यापासून प्रभारींच्या खांद्यावर भार

City President of MNS Rakesh Bhamre and office bearers presenting a statement to Additional Collector Maya Patole.
City President of MNS Rakesh Bhamre and office bearers presenting a statement to Additional Collector Maya Patole.esakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता १२ टक्के क्षेत्र असलेला मालेगाव हा सर्वात मोठा तालुका आहे. महसूलच्या दृष्टीने पाहिले असता यात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि नांदगाव विधानसभा मतदार संघात येथील गावांचा समावेश आहे.

संवदेनशील शहर म्हणून गृहविभागात नोंद आहे. येथील महसूल विभागाचे कामकाजही मोठे आहे. एवढी मोठी व्याप्ती असताना तब्बल पाच महिन्यांपासून पूर्णवेळ तहसीलदार नाही. प्रभारींच्या खांद्यावर भार असून यामुळे न्यायिक, अर्ध न्यायिक प्रकरणे व विविध कामकाज ठप्प असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.

कायमस्वरूपी तहसीलदार तातडीने नियुक्त करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांना निवेदन देण्यात आले. (Malegaon full time tehsildar problem Burden on shoulders of in charge from 5 months nashik news)

येथील तहसीलदार चंद्रजित राजपूत १९ सप्टेंबर २०२२ पासून रजेवर आहेत. यानंतर तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला. या काळात शासकीय कोणतेही कामकाज झालेले नाही.

प्रभारी तहसीलदार कैलास पवार महत्त्वाच्या फाइलवर कार्यवाही करण्यास धजावत नाहीत. श्री. राजपूत कामावर रूजू होत नाहीत. महसुलाच्या या गोंधळात शहरवासीयांचे नुकसान होत आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

City President of MNS Rakesh Bhamre and office bearers presenting a statement to Additional Collector Maya Patole.
Nashik News : बारावी परीक्षा केंद्राबाहेरील झेरॉक्स दुकाने सर्रास सुरू!

प्रभारी तहसीलदारांनी २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रशासकीय कामकाज पूर्ण केले का? किती प्रकरणांवर निर्णय घेतला? किती प्रकरणांची सुनावणी घेतली? याची चौकशी करावी. कामे झाली नसल्यास दोषींवर कारवाई करावी. पूर्णवेळ तहसीलदाराची तातडीने नियुक्ती करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात श्री. भामरे, तालुकाध्यक्ष अविनाश चव्हाण, सरचिटणीस प्रवीण सोनवणे, भरत सूर्यवंशी, चेतन आसेरी, शुभम खैरनार, पुरुषोत्तम जगताप, विशाल शेवाळे, माजीद खाटवाला, मोहसीन शेख, मनीष निकम, सतीश अहिरे, गणेश पवार, खुशाल लोंढे, प्रतीक सरोदे आदींचा समावेश होता.

City President of MNS Rakesh Bhamre and office bearers presenting a statement to Additional Collector Maya Patole.
Nandurbar News : भूजगाव, हरणखुरीत आता बालविवाह करण्यास बंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.