Malegaon MSG College : धर्मप्रचार प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा

malegaon msg college Propaganda of Islam Crime against 15 persons nashik news
malegaon msg college Propaganda of Islam Crime against 15 persons nashik newsesakal
Updated on

Malegaon MSG College : मसगा महाविद्यालयाच्या एसवाय बीए हॉलमध्ये रविवारी (ता.११) सकाळी शहरातील सत्य मलिक लोकसेवा ग्रुप व पुण्याच्या अनिस डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटतर्फे प्रशिक्षण, मार्गदर्शन मेळावा झाला.

या मेळाव्यात प्रशिक्षणापेक्षा इस्लाम धर्माची जास्त माहिती देण्यात आली. (malegaon msg college Propaganda of Islam Crime against 15 persons nashik news)

इस्लाम धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगतानाच शिक्षणासाठी येऊन तरुणांना आर्थिक आमिष दाखविण्यात आल्याचे तसेच धर्म प्रसार करणारे बॅनर, पोस्टर्स कार्यक्रमात लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मसगा महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन मेळाव्यात इस्लाम धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न झाल्याच्या आरोपावरून कॅम्प पोलिस ठाण्यात श्‍याम माधवराव देवरे (वय २३, रा. जुना होळी चौक) यांच्या तक्रारीवरून १५ जणांविरुद्ध जातीय तेढ निर्माण करणे व प्रशिक्षणाच्या नावाखाली धर्माचा प्रचार, प्रसार केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक, सूत्रसंचालक, प्राचार्य, उपप्राचार्य तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रमुखांसह पंधरा जणांविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणात इस्लाम धर्म श्रेष्ठ असल्याचे तसेच नमाज पठण केल्यामुळे मन प्रसन्न होते. अभ्यासात ऊर्जा मिळते असे सांगतानाच हिंदू धर्माशी तुलना करून तरुणांना धर्मांतरासाठी वश करण्याचा प्रयत्न असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संशयावरून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महाविद्यालयातील हॉलमध्ये घुसून जोरदार घोषणाबाजी करत हा कार्यक्रम बंद पाडला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

malegaon msg college Propaganda of Islam Crime against 15 persons nashik news
Social Media Precaution : सावधान! सोशल मीडियावर अतिउत्साहाने व्यक्त होऊ नका.... नाहीतर

याप्रकरणी काल शहर व परिसरात दिवसभर चर्चा सुरु होती. कार्यकर्त्याने तक्रार देऊनही रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. यानंतर काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतली.

त्यांनी पोलिस अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी व माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांना वस्तुस्थिती जाणून घेत तक्रार दाखल करा अशा सूचना केल्या. वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

"विद्यार्थ्यांना सैन्यदल व करिअरच्या अन्य वाटा व प्रशिक्षणाबाबत माहिती व्हावी या हेतूने व पुण्यातील अनिस डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटतर्फे कार्यक्रम असल्याने व्याख्यान घेण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे. त्यांना नवीन संधींची माहिती व्हावी हाच आपला निर्मळ हेतू होता." - सुभाष निकम, प्राचार्य

malegaon msg college Propaganda of Islam Crime against 15 persons nashik news
Malegaon : धर्मांतर करतो म्हणून प्राचार्याचे निलंबन! ठाकरे गटाच्या आमदाराच्या कॉलेजमध्ये प्रार्थनेवरुन वाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.