Summer Season : मालेगावला उन्हाचा पारा वाढला; ठिकठिकाणी थाटली शीतपेयांची दुकाने

sugarcane juice
sugarcane juiceesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. येथे तापमान सरासरी ३८ ते ४० अंश डिग्रीवर पोचले आहे. उन्हाच्या चटक्याने शहर व परिसरात रसवंतीगृह, लिंबू शिखंजी, बर्फ गोळा, कुल्फी, मसाला ताक यांची दुकाने लागली आहेत. (Malegaon summer season temperature rises Soft drink shops establish everywhere nashik news)

सटाणा रोड व कॅम्प रोडवर ताक विक्रीच्या दुकानांवरची गर्दी वाढू लागली आहे. शहर व परिसरात दोनशे पेक्षा अधिक रसवंतीगृह तर ६० लिंबू शिखंजीची दुकाने लावण्यात आली आहेत. रसवंतीला लागणारे ऊसाचे भाव वाढले आहेत. सहा हजार रुपये टन दराने उस घ्यावा लागत आहे.

रसवंती व्यवसायातून मालेगावला रोज सुमारे १५ टन ऊस विकला जात आहे. यासाठी मराठवाडा, नाशिक व पुणे भागातून ऊस विक्रीस येत आहे. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात उसाचे भावही वाढण्याची शक्यता येथील ऊस व्यापारी मोहम्मद खान यांनी व्यक्त केली आहे. लिंबू शिखंजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्याचे दर वाढल्याने किंमतीतही वाढ झाली आहे.

शहरात चार दिवसापासून तापमान वाढले आहे. आता मार्च महिना लागल्याने तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

sugarcane juice
SSC Exam 2023 : मराठीच्या पेपरला विभागात 4762 विद्यार्थ्यांची दांडी! 2 ठिकाणी गैरमार्गांचा अवलंब

येथे सटाणा नाका, मोसम पुल, कॉलेज ग्राउंड, मनमाड चौफुली, टेहरे चौफुली, रावळगाव नाका, सोमवार बाजार यासह विविध भागासह ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर रसवंती व लिंबू शिखंजीची दुकाने लावण्यात आली आहेत.

येथील टेहरे चौफुलीलगत बिहार व उत्तर प्रदेशातून आलेल्या व्यावसायिकांचीही दुकाने थाटली आहेत. तसेच शहरातील काही व्यावसायिकांनी चारचाकी व तीनचाकी वाहनात रसवंती सुरु केली आहे. कसमादे परिसरातही रस्त्यालगत शेत असलेल्या शेतकरी बांधवांनीही रसवंतीगृह सुरु केली आहेत.

"बर्फ, लिंबू व उसाचे भाव वाढल्याने लहान ग्लास १५ तर मोठा ग्लास २० रुपयाला मिळत आहे."

- अमोल महाजन, रसवंती चालक, मालेगाव

sugarcane juice
NMC Notice : शंभरहून अधिक मालमत्ताधारकांना नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()