इगतपुरी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नाशिक येथील सभेचा मंडप अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मंडप अंगावर कोसळल्यानं दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ही दुर्घटना घडली. या मतदारसंघातील उमदेवार लकी जाधव या महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी खर्गे इथं आले होते.