Nashik News : माध्यमिक शिक्षक पतपेढीत 2 कोटींचा गैरव्यवहार! मनोज पाटलांसह पॅनलचा आरोप

Embezzlement news
Embezzlement newsesakal
Updated on

जळगाव : येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीत चेअरमन व संचालक मंडळाने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करून खोटे प्रस्ताव दाखल केले.

सिटी सर्वे नंबर ७३१३ प्लॉट क्रमांक ६ खरेदीत २ कोटी २४ लाख ८१ हजार ४२५ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप लोकसहकार प्रगती शिक्षक सेनेचे अध्यक्ष मनोज पाटील, रावसाहेब पाटील, विनोद महेश्री यांनी मंगळवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत केला. (Malpractice of 2 crores in secondary teachers loan fund Nashik News)

ते म्हणाले, की पतपेढीच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्ये संपली असताना, दोन वर्ष कारभार संचालकांनी केला. जो नियमबाह्य आहे. त्यात पतपेढीची मुख्य इमारत मोडकळीस दाखवून सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करून खोटे प्रस्ताव दाखल केले.

नवीन इमारतीचा प्लॉट मुळमालक विजया पाटील यांच्या मालकीचा असताना, प्रत्यक्ष अबोली कन्स्ट्रकशनचे मालक चंद्रकांत चौधरी यांना हाताशी धरून त्यांच्याकडून ४ कोटी २१ लाख ८१ हजार ४२५ रुपयांना खरेदी करण्यात आला.

हाच प्लॉट विजया पाटील यांना १ कोटी ९७ लाखांत विकला. अबोली कन्स्ट्रकशनला हाताशी धरून ६ डिसेंबर २०१७ ला पतसंस्थेकडून २ कोटी ५० लाख रुपये ते मालक नसताना ॲडव्हान्स देऊन बनावट सौदेपावती केली. १९ डिसेंबर २०१७ ला पुन्हा १ कोटी ७१ लाख ८१ हजार धनादेशाने दिली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Embezzlement news
Dhule News | धुळ्यात हुडहुडी परतली; पारा @7.8, दैनंदिन जनजीवनावर परिणाम

मुळे मालक व दलाल यांच्या झालेल्या व्यवहाराची वजाबाकी करता २ कोटी २४ लाख ८१ हजारांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार दिली. जिल्हा उपनिबंधकांनी याप्रकरणी संचालक मंडळावर अपहाराचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे.

उपनेते रवींद्र पाटील, सुरेश कोल्हे, राजेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. यासंदर्भात पतपेढीचे चेअरमन एस. डी. भिरुड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Embezzlement news
Nashik News: आचारसहिंतेत मुख्यालयातील इमारत दुरुस्तीचा डाव; ZP बांधकाम विभागाकडून 85 लाखांचा प्रस्ताव दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.