नाशिक : आनंदवल्लीतील मंडलिक खून प्रकरणानंतर अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधार रम्मी राजपूत यास मंजूर करण्यात आलेला जामीन अर्जाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा अटक केली. प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या राजपूतची सोमवारी (ता. १४) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, पुन्हा जामिनासाठी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी (ता. १५) सुनावणी होणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. (Mandlik Murder case Bail hearing of land mafia Rummy Rajput today Nashik News)
गेल्या फेब्रुवारी २०२१ मध्ये गंगापूर रोडवरील आनंदवली परिसरातील रमेश वाळू मंडलिक (७०, रा. आनंदवल्ली) यांचा खून करण्यात आला होता. शहर गुन्हेशाखा व गंगापूर पोलिसांनी कसून तपास करीत याप्रकरणामागे असलेल्या भूमाफिया टोळीची उकल पोलिसांनी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी १६ संशयितांना अटक करीत, त्यांच्याविरोधात मोक्काअन्वये कारवाई केली. तर, गुन्ह्याचा सूत्रधार रम्मी राजपूत सहा महिने फरार होता. त्यास पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून अटक केली होती.
दरम्यान, त्यास पत्नीच्या आजारपणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. गेल्या आठवड्यात त्याच्या जामिनाची मुदत संपल्याने गंगापूर पोलिसांनी त्यास अटक केली. मात्र अटक होताच त्याची प्रकृती खालावल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्याने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. सोमवारी (ता. १४) अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. यु. कदम यांच्यासमोर युक्तिवाद झाला. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुधीर कोतवाल यांनी विरोध केला. न्यायालयासमोर सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.