सातपूर परिसरात दोघींचे मंगळसूत्र ओरबाडले

Chain snatcher latest marathi news
Chain snatcher latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : सातपूर परिसरात श्रमिकनगरमध्ये महिलेची ५८ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, तर दुसऱ्या घटनेत आयटीआय सिग्नल येथील पोस्ट ऑफिस समोरून पायी जाणाऱ्या महिलेचे ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या भामट्याने खेचून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. (Mangalsutra snatching of women in Satpur area nashik Crime Latest Marathi News)

Chain snatcher latest marathi news
Diwali, Dasara खरेदीचा कर्मचाऱ्यांचा मुहूर्त हुकला

पहिल्या घटनेत अर्चना रवींद्र चांदोड (रा. शिवशंकर राज अपार्टमेंट, श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या २३ ऑगस्टला सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सातपूरमधील कडेपठारच्या कुमावत बिल्डिंग समोरून दळण दळण्यासाठी गिरणीकडे पायी जात होत्या. त्या वेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या संशयिताने गळ्यातील ५८ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले.

तर दुसऱ्या घटनेत अंजना अजित राजपूत (रा. नाईस संकुल, एमआयडीसी सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या २२ जुलैला सकाळी साडेअकराच्या सुमारास आयटीआय सिग्नल परिसरातील पोस्ट ऑफिससमोरून घराकडे पायी जात होत्या. त्या वेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला.

Chain snatcher latest marathi news
Nashik : नागरिकांच्या विरोधानंतर रस्त्यात सिमेंटचे गट्टू बसविण्यास सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.