Manikrao Kokate : अजित पवार यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची त्यांची हातोटी, अनुभव पाहता त्यांच्यासोबत जाणे योग्य वाटले.
त्यांना समर्थन देण्यामागे माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसून सिन्नर मतदारसंघाचा सर्वांगिण विकास एवढेच ध्येय असल्याचे सांगत सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मी राष्ट्रवादीतच असून पुढची निवडणूक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच लढवणार आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी मी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळ ठरवेल असेही त्यांनी स्पष्ट केले. (Manikrao Kokate statement With Ajit Pawar only for development of constituency nashik)
श्री. कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी सायंकाळी सिन्नर येथे सुसंवाद मेळावा घेतला. या मेळाव्यात मतदारसंघातील समर्थकांशी चर्चा करताना त्यांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारल्या शिवाय सिन्नरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही असे नमूद केले.
सतत पक्ष बदलत राहण्याचा आरोप खोडून काढताना कोकाटे यांनी मी फक्त सिन्नरच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीच पक्ष बदल केल्याचे सांगितले. आज देखील सर्वच पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांची आपला संवाद चांगला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विधानसभेत विरोधात बसल्याने कामे रखडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या पक्षात प्रवेश करा तरच कामे होतील असे सांगितले. अजित पवारांच्या माध्यमातून सिन्नरमध्ये अभूतपूर्वकामे होतील असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.
दरम्यान उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी सिन्नरसाठी शंभर कोटींच्या विकास कामांसाठी निधी मिळण्याची शिफारस केली आहे असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.