Nashik News: मांजरपाडा-2 वळण योजनेस मिळावी प्रशासकीय मान्यता; देवेंद्र फडणवीसांना पालकमंत्र्यांचे पत्र

Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal
Updated on

Nashik News : गिरणा खोरे तुटीचे आहे. कळवण- बागलाण- मालेगाव- देवळ्यासह खानदेशवासीयांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरणारा आहे. गेल्या चार दशकांपासून यासंबंधी मागणी होत आहे.

मांजरपाडा-१ प्रकल्पाला सरकारने परवानगी देऊन प्रत्यक्ष काम पूर्ण झाले. त्याचवेळेस मांजरपाडा-२ प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. (Manjarpada 2 diversion scheme to get administrative approval Guardian Minister letter to Devendra Fadnavis Nashik News)

मांजरपाडा-२ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून, या प्रकल्पाचे राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे छाननीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेभाजप सरकारने ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

त्याचवेळी मांजरपाडा-२ कडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही भुसे यांनी पत्रात म्हटले आहे. भुसे म्हणाले, की पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वापराविना अरबी समुद्रास (गुजरात) जाऊन मिळते.

हे अतिरिक्त पाणी पूर्वेकडील तुटीच्या गिरणा उपखोऱ्यात वळविणे हा मांजरपाडा-२ योजनेचा मुख्य उद्देश आहे. केम डोंगरात उगम पावणाऱ्या नार-पार नदीवर मांजरपाडा-२ योजना साकारण्याचे प्रस्तावित आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Devendra Fadnavis
Nashik News: ZP पशुसंवर्धनचा चारा लागवडीवर भर! चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सरसावला

पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त

पश्चिम वाहिनीतून समुद्राला मिळणारे पाणी अडवून अतितुटीच्या गिरणा खोऱ्यात (तापी खोरे) पाणी वळवून चार हजार ९१५ हेक्टर सिंचन क्षेत्राचे व टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचे स्थिरीकरण करणे आवश्यक आहे.

एकात्मिक जल आराखड्यानुसार १७.९८ दक्षलक्ष घनमीटर (६३४.९६ दशलक्ष घनफूट) इतकी पाणीसाठ्याची तरतूद ठेवण्यात आली आहे.

या प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त आहे. मांजरपाडा-२ (गुगुळ-पार-तापी) गिरणा प्रकल्प अहवाल हा तापी पाटबंधारे प्रकल्प महामंडळाने सादर केला आहे, असेही श्री. भुसे यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Nashik News: ZP पशुसंवर्धनचा चारा लागवडीवर भर! चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सरसावला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.