पेठ (जि. नाशिक) : पारंपारिक शेती मशागत ही अस्मानी आणि सुलतानी आणि शेतमजुराचा तुटवडा संकटामुळे ही आर्थिक दृष्ट्या न परवडणारी झाली आहे. त्यातच आधुनिकतेची कास शेतकऱ्यांनी धरली आहे. पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनीही आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहे.
पिंपळपाडा (ता. पेठ) येथील मंजुळा मनोहर गवळी येथील शेतकरी महिलेने मोडक्या संसाराला व्यवसायाची जोड देण्यासाठी कुटुंबाला आर्थिक उभारी देणारे मळणी यंत्र खरेदी केले. त्यानंतर या आधुनिक यंत्राने मंजुळा गवळी यांना जगण्याचे खरे बळ दिले. (Manjula Gawli from tribal area experimented with modern technology in farm SAKAL Special nashik news)
अडीच एकर शेतीवर एकत्रित कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले होते. शेतीला व्यवसायाची जोड असावी म्हणून शेतकरी कृषी योजनेखाली तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्याकडे मळणी यंत्र मिळविण्यासाठी अर्ज केला.
अन् सौ. गवळी कृषी योजनेच्या लाभार्थी झाल्या. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना कमी वेळात कमी खर्चात भात नागली वरईची मळणी करणारे यंत्र मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होत आहे.
आधुनिक शेतीची कास
पेठ तालुका अतिवृष्टीचा चेरापुंजी म्हणून परिचित. त्यामुळे या भागात भात नागली वरई ही पिके घेतली जातात. ही शेती करताना अंत्यत कष्टमय आणि खर्चिक आहे. मात्र, आजचा तरुण शेतकरी पारंपारिक शेती न करता आधुनिक शेतीची कास धरु लागला आहे. पिकून आलेल्या पिकांची मळणीसाठी आधुनिक व वाढत्या कृषी तंत्रज्ञानाने गाव खेड्यावर खळ्यावर होणारी मळणी नजरेआड झाली.
खळ्यावरील भात नागली वरई मळणी आता यंत्राने घेतली. पूर्वी खळ्यावरील मळणीसाठी गोलाकार बैल फिरवित रात्रंदिवस मजुरांमार्फत मळणी होत असे. अनेक दिवस पीक काढणीला लागत असल्याने शेतमजूर आणि बैल जोडी पाळणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. त्यामुळे शेतकरी आपसूकच तंत्रज्ञानाकडे वळला अन् मळणी यंत्र वापरू लागला.
व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन
उपजीविकेसाठी स्थलांतर करणाऱ्या दोन तरुणांना तालुक्यातच रोजगार मिळाल्याने त्यांचा उदरनिर्वाहासह कुटुंब आणि मुलांचे शिक्षणाची समस्या सुटली. माझी गरीबी दूर झाली. त्यातच तरुणांना प्रत्येकी पाचशे ते सातशे रुपये रोज दिला. त्यामुळे कष्ट, मेहनत आणि चिकाटी करण्याची तयारी असणाऱ्या तरुणांनी योजनांची माहिती घेऊन व्यवसायाकडे वळावे. अशी आशा मंजुळा गवळी यांनी व्यक्त केली.
"शेतीला जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर व मळणी यंत्र घेतल्याने मला दिवसाकाठी खर्च वजा जाता दोन ते अडीच हजार रुपये मिळू लागले. मळणी हंगामात ६० दिवसात दोन लाखाची कमाई झाली. शिवाय मळणी यंत्र चालविण्यासाठी व देखरेखीसाठी दोन तरुणांना रोजगार देऊ शकले."
- मंजुळा गवळी, शेतकरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.