Manmad Bazar Samiti : मनमाड बाजार समिती बैठकीत गदारोळ; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

Committee office bearers, directors, members etc. present at the annual meeting of the market committee.
Committee office bearers, directors, members etc. present at the annual meeting of the market committee. esakal
Updated on

Manmad Bazar Samiti : बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभेत आज चांगलेच नाट्य दिसून आले. सभेत विरोधकांनी गदारोळ करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.

तसेच सभेचे प्रोसिडिंग बुक घेऊन जात सभेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करत सत्ताधारी शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत असल्याने हे विरोधकांना पाहवत नसल्याने त्यांनी सभेत गोंधळ घालून सभेला गालबोट लावल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर केला.

त्यामुळे शनिवारी (ता.२४) बाजार समितीची पहिलीच वार्षिक सभा चांगलीच वादळी ठरल्याने चर्चेला उधाण आले होते. (manmad bazar samiti meeting opponent raised mess and pushed employees nashik news)

बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेच्या प्रारंभी बाजार समितीचे सचिव व्ही.पी राठोड यांनी उपस्थितांना विषय पत्रिका वाचून दाखवली. बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार संजय पवार, उपसभापती कैलास भाबड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा संचालक गणेश धात्रक, ज्येष्ठ संचालक ॲड. गंगाधर बिडगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा संचालक दीपक गोगड यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.

यावेळी सभापती संजय पवार बोलताना म्हणाले,की बाजार समितीचा खरा मालक हा शेतकरी असून संचालक मंडळ त्याचा नोकर आहे. त्यामुळे शेतकरी मालकाला बाजार समितीत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समितीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. एका महिन्यात सत्ता काबीज केल्यानंतर बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

त्यासाठी व्यापारी, हमाल मापारी आणि कामगारांचे सहकार्य असून आता उत्पन्नात वाढ झाली आहे. बाजार समितीत पेट्रोल पंप, बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शौचालाय बांधणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, भोजनालय सुरु करणे, पावसाळ्यात शेतमाल भिजू नये म्हणून शेड उभारणे आदी कामे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Committee office bearers, directors, members etc. present at the annual meeting of the market committee.
Wedding Season: लग्नसराईने कष्टकऱ्यांच्या बरकतीला बळ! हाराच्या निर्मितीतून मिळतोय अनेक महिलांना रोजगार

सभा संपत आल्याचे लक्षात येताच विरोधकांनी सभेत गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला. विरोधक हे देखील संचालक सभापती राहिले आहे. त्यांच्या काळात अशी सभा झाली नाही. त्यामुळे ही सभा त्यांना बघविली नाही म्हणून त्यांनी समितीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत अरेरावी केली. सभेचे प्रोसिडिंग बुक, दप्तर, कागदपत्रे घेऊन गेले.

मात्र नंतर त्यांच्या मनाला लाज वाटल्याने त्यांनी ते पुन्हा कार्यालयात आणून दिल्याचा आरोप सभापती यांनी केला. या सर्व कृतीतून विरोधकांचा बालिशपणा दिसून आला. या सभेस विरोधकांनी गालबोट लावल्याचे सत्ताधारी गटाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Committee office bearers, directors, members etc. present at the annual meeting of the market committee.
Sambhajiraje Chhatrapati : महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण : संभाजीराजे छत्रपती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()