Nashik News: मनमाडकरांच्या पाण्याला गळती! मुख्य जलवाहिनीच्या गळतीकडे पालिकेचेच दुर्लक्ष

Wasted water and overgrown grass due to burst water mains
Wasted water and overgrown grass due to burst water mainsesakal
Updated on

Nashik News : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी केकाणनगर परिसरात फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. या भागात गळतीमुळे पाणी साचत असल्याने गवत आणि डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.

पालिका प्रशासनाने तातडीने सदर गळतीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आधीच तहानलेल्या मनमाडकरांच्या पाण्याच्या असा अपव्यय होत असून पालिकेने त्यात युद्धपातळीवर लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Manmad people water leak municipality neglect of leakage of main water channel Nashik News)

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणावरून शहरातील विविध जलकुंभ भरण्यासाठी मुख्य जलवाहिनी असून ती जलवाहिनी केकाणनगर परिसरातून गेली आहे. परंतु काही महिन्यांपासून या जलवाहिनीललागळती लागली आहे.

त्यामुळे या भागात पाणी साचले आहे. गळतीची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. आजही शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक पाण्यासाठी हैराण झाले आहे.

अशात जलवाहिनीच्या गळतीतून पाणी वाया जात असल्याने ही गंभीर बाब आहे. जलवाहिनीही जागोजागी गळत असल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे.

Wasted water and overgrown grass due to burst water mains
Nashik: टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या-मेंढ्या! उत्पादनासह वाहतूक खर्चही निघेना; शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा

हे पाणी रस्त्यावर आणि रहिवासी भागात साचत असल्याने गवत वाढले आहे, त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून नागरिकांना त्रास जाणवू लागला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

डासांमुळे आजाराची साथ पसरू शकते, त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन जलवाहिनी दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी केली जात आहे.

"वर्दळीच्या रहिवासी भागातून मुख्य जलवाहिनी गेली असून ही जलवाहिनी फुटली आहे. त्यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असल्याने गवत वाढले आहे. यामुळे डासांचा त्रास जाणवू लागला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लिकेज दुरुस्ती करावी."- बाळू माळवतकर, स्थानिक नागरिक.

Wasted water and overgrown grass due to burst water mains
Nashik: आयुक्त हटाव, शहर बचावचा नारा! मालेगावात MIM पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल; पूर्व भागात कामांबाबतही भेदभाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.