Skin care Tips: आपले सौंदर्य खुलवा, पण अनुभवी तज्ज्ञांच्या सल्ल्याने!

Skin care Tips
Skin care Tipsesakal
Updated on

निखिलकुमार रोकडे : सकाळ वृत्तसेवा

सौंदर्य हा स्त्रीचा खरा दागिना आहे, तो कायम राहण्यासाठी प्रत्येक स्त्री प्रयत्नशील असते. मेकअप ही पूर्वापार प्रचलित असणारी कला आहे. काळानुसार तिचे स्वरूप बदलत गेले, तरी तिचे महत्त्व आजही अधोरेखित आहे.

आजच्या धावत्या जगात सर्वांना छान दिसावं, असे वाटते, त्यात गैर काहीही नाही. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपले सौंदर्य अधिक खुलवता व उठावदार करता येते. मात्र त्यासाठी अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मत आघाडीच्या मेकअप आर्टिस्ट वैशाली लांबे यांनी व्यक्त केले.

(manmokala sakal special interviewer nikhil rokade interview of makeup artist vaishali tambe nashik)

प्रश्‍न ः मेकअप क्षेत्राकडे कसे वळलात?

- मला सुरवातीपासूनच मेकअपबद्दल आकर्षण होते. शाळेत असतानाच बीटपासून लिपस्टिक बनविली होती. सुरवातीस निफाडमध्ये विवाहात अनेक ठिकाणी मी मेंदी काढून देत असे. या तालुक्यातील मी प्रथम मेंदी आर्टिस्ट होय.

मी घरातच छोटसं ब्यूटिपार्लर सुरू केले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, की या क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे मी पूर्ण वेळ या क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. लग्नानंतर मी या क्षेत्रातील शास्त्रोक्त शिक्षण घेतले. यात प्रामुख्याने एबीटीसी, सिडेस्को असे नॅशनल व इंटरनॅशनल दर्जाचे सहा कोर्स पूर्ण केले.

प्रश्‍न ः मेकअप क्षेत्रातील वाटचाल सांगा?

- निफाडमधील ब्यूटिपार्लरनंतर मी नाशिकमध्ये मॅग्नम हॉस्पिटलसमोर, कॅनडा कॉर्नर येथे वैशाली लांबे ब्यूटि सलोन व मेकअप ॲकॅडमी सुरू केली. अल्पावधीतच त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. मी आतापर्यंत देशात विविध ठिकाणी या क्षेत्राशी जोडली गेली आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Skin care Tips
Summer Season: नाशिककरांना थंड करण्यासाठी दररोज 12 टन बर्फ खर्ची! उन्हाचा पारा वाढताच मागणी वाढली

माझ्या ॲकॅडमीच्या माध्यमातून मेकअप कसा करावा, या संदर्भात नियमितपणे मार्गदर्शन करीत असते. अनेकांनी माझ्याकडून शिक्षण घेऊन स्वतःचे करिअर घडविले आहे. या सर्व वाटचालीत पती सचिन लांबे यांचे मला सतत मार्गदर्शन मिळत असते.

प्रश्‍न ः मेकअपचे प्रकार सांगा?

- मेकअप हे अत्यंत विस्तारित असलेले क्षेत्र आहे. त्यात रोज नवनवीन तंत्रज्ञाना समोर येत आहे. मेकअपच्या बाबतीत रिक्वायरमेंट निरनिराळ्या असतात. यात प्रामुख्याने एचडी वॉटर रेजिस्टन्स, प्रोथिस्टिक, ब्रायडल, फॅशन शो, सेलिब्रिटी मेकअप असे विविध प्रकार आहेत. वेळेअभावी ज्यांना रोज मेकअप करणे शक्य नसते.

त्यामुळे सेमी मेकअप ही एक कन्सेप्ट आहे. या माध्यमातून अनेक कालावधीपर्यंत तुम्ही स्वतःचे सौंदर्य खुलवून ठेवू शकतात. मेकअप शिकविणे, सलोन सर्व्हिस, स्पा, नेल आर्टिस्ट, स्किन ट्रीटमेंट अल्ट्रा साउंड, हाय फ्रिक्वेन्सी, हायड्रा ट्रीटमेंट तसेच पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंतच्या मेकअप संदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा आमच्या सलोन व ॲकॅडमीत उपलब्ध आहेत.

Skin care Tips
Bank Loan : सूक्ष्म, लघुउद्योगांना सहकारी बॅंकांचे कर्ज; जिल्हा उद्योग केंद्राकडून सरकारला प्रस्ताव सादर

प्रश्‍न ः मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी?

- जी व्यक्ती मेकअप करणार आहे व ज्याचा करावयाचा आहे, त्या दोघींनीही काही काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये स्वच्छता हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. मेकअपसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू अथवा प्रोडक्ट कोणत्या दर्जाचे आहेत व त्याची एक्सपायरी डेटही तपासून घेतली पाहिजे.

पिंपल असलेल्या स्किनवर आपले काही इन्स्ट्रुमेंट वापरले असतील, तर ते दुसरीकडे वापरू नये. ब्यूटि प्रॉडक्ट उन्हामध्ये ठेवू नये. दोघांमध्येही काही प्रमाणात सुरक्षित अंतर हवे. आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.

प्रश्‍न ः युवा पिढीला काय संदेश द्याल?

- शिक्षण हे महत्त्वाचे आहे. पण शिक्षणाबरोबरच अशी अनेक क्षेत्र आहेत, की ज्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्र कमी-अधिक असली तरी तुम्ही त्या क्षेत्रात करिअर करू शकता. त्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. मेकअप आर्टिस्ट हे असेच एक क्षेत्र आहे. यात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. तसेच या क्षेत्राला ग्लॅमरही आहे.

त्यामुळे कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी आपणास मिळू शकते. प्रामाणिकपणा, चिकाटी, व्यवहारातील पारदर्शकता, उच्च गुणवत्ता, योग्य किंमत, तत्पर सेवा हे गुण आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावे. यामुळे अल्पावधीतच आपण यात यशस्वी होऊ शकतो.

Skin care Tips
Nashik News : नामपूरच्या स्वच्छतागृहाला उद्घाटनाची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.