Manoj Jarange Patil: येणारा काळ कसोटीचा... येवलेकरांनो सावध रहा! : मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil: येणारा काळ कसोटीचा... येवलेकरांनो सावध रहा! : मनोज जरांगे-पाटील
Updated on

Manoj Jarange Patil : येवलेकरांसाठी येणारा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे तुम्ही सावध राहावे. आपल्यातीलच एखाद्या नेत्याला आपल्याविरोधात उठवू शकतील. आपली आता कसोटी आहे, अशा लोकांवर थोड ध्यान ठेवा, असा इशारा मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येवलेकरांना दिला.

येत्या २४ नोव्हेंबरला सरकार कायदा पारित करेल आणि राहिलेल्या सर्वांना ओबीसीमधूनच कुणबी म्हणून ५० टक्क्यांच्या आत टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वास जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला. (Manoj Jarange Patil advice to yeola people to be careful maratha reservation nashik news)

जरांगे-पाटील यांच्या भेटीसाठी मंगळवारी (ता. १४) येवलेकरांनी रायगडाहून आणलेली मशाल येवल्याहून पायी प्रवास करून अंतरवाली सराटी येथे नेली. त्या वेळी येवलेकरांशी जरांगे-पाटील बोलत होते. मशाल घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांसह तब्बल २५० ते ३०० गाड्यांतून मराठा समाजबांधव अंतरवाली सराटी येथे पोहोचले होते.

रायगडाहून आणलेल्या मशालला साक्ष ठेवून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. आरक्षणाची लढाई आपण ७० टक्के जिंकली आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्रे मिळत आहेत. ७० वर्षे नोंदीच नाही, कागद सापडेना, असे म्हणत होते. आता सापडत असलेल्या नोंदीवरून समितीचा अहवाल तयार होऊन मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे सिद्ध होईल, असा विश्वास जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.

आता नेहमी एकजूट ठेवायची. आपल्या लेकरांच्या अन्नात माती कालवू नको. आपण शेतकरी आहोत. आपल्याशी कोणी खेटणार नाही अन् खेटला तर आपले हात दगडावांनी निबार आहेत, असे जरांगे-पाटील म्हणाले. मराठा समाजाला सरसकटच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, तेही ५० टक्क्यांच्या आत मिळावे, अशी महाराष्ट्राची मागणी आहे.

Manoj Jarange Patil: येणारा काळ कसोटीचा... येवलेकरांनो सावध रहा! : मनोज जरांगे-पाटील
Manoj Jarange Patil यांनी Maratha Reservation साठी आंदोलन करणाऱ्यांना दिलं 'हे' काम

सर्व समाजाचे एकमत आहे. कोणत्याही राजकारणाचे ऐकून आपल्यात मतभेद करू नका, सावध राहा. मशाल घेऊन आलेल्या हजारो येवलेकरांचे मनापासून कौतुक करतो, असे जरांगे-पाटील म्हणाले.

दरम्यान, रायगडाहून आणलेली मशाल अंतरवाली सराटीत पोचतात महिलांनी मशालीचे पूजन करून गावाच्या वेशीवर स्वागत केले. मशाल उंचावून संकेत शिंदे, अमृत जमधडे, रवी बांगर, समाधान जमधडे, ऋषी काळे, हिंमत जमधडे, अमृत जमधडे यांचे जरांगे-पाटील यांनी स्वागत केले. ठिय्या आंदोलनात ३६ दिवस सहभागी असलेल्या गोरख संत यांना हार घातला.

जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला. येथील ॲड. शाहूराजे शिंदे, सचिन आहेर, महेश काळे, गणेश सोमासे, भागवतराव सोनवणे, विजय पठाडे, योगेश जहागीरदार, दिनेश पागिरे, झुंजारराव देशमुख, आदेश काळे, अक्षय तांदळे, प्रशांत देशमुख, निवृत्ती जगताप, प्रमोद पाटील, गोरख संत, रामकृष्ण खोकले आदींसह सकल मराठा समाजाचे शेकडो बांधव सहभागी झाले होते

Manoj Jarange Patil: येणारा काळ कसोटीचा... येवलेकरांनो सावध रहा! : मनोज जरांगे-पाटील
Manoj Jarange Patil: तर जगातली सगळ्यात सुधारित आणि पुढारलेली जात मराठा असती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.