Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यात नव्याने ३२ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीचा फायदा सुमारे दीड ते पावणे दोन कोटी मराठा समाजबांधवांना होणार असल्याचा विश्वास मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.
ठाणगाव (ता. सिन्नर) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. (Manoj Jarange Patil statement about Two crore Marathas will benefit from Kunbi registration nashik news)
इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील सभा आटोपल्यानंतर श्री. जरांगे-पाटील बुधवारी (ता. २२) दुपारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अकोले तालुक्यातील विश्रामगड (पट्टा किल्ला) या ठिकाणी भेट दिली.
त्यानंतर ठाणगावमार्गे संगमनेरला जात असताना, त्यांचे ठाणगाव परिसरातील मराठा समाजबांधवांनी स्वागत केले. छोटेखानी सभेत त्यांनी मराठा आरक्षणाची गरज व राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली.
आंदोलनाच्या दणक्यामुळे राज्यात रोज नव्याने कुणबी नोंदी सापडत आहेत. त्याचा फायदा मराठा समाजातील युवक युवतींना येत्या काळात शैक्षणिक सवलती व नोकऱ्यांमध्ये घेता येईल. सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्यापूर्वीच सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा श्री. जरांगे यांनी व्यक्त केली.
डेटलाईन पाळली न गेल्यास सरकारविरोधात कोणती भूमिका घ्यायची, हे २५ डिसेंबरला सांगितले जाईल. तोपर्यंत १ डिसेंबरपासून प्रत्येक गावात मराठा समाजबांधवांनी साखळी उपोषण सुरू करावे, असे ते म्हणाले. ठाणगाव, पाडळी, टेंभुरवाडी, हिवरे, पिंपळेसह सिन्नर व अकोले तालुक्यातील मराठा व इतर समाजबांधव या वेळी उपस्थित होते.
"७० वर्षांपूर्वीच मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणे आवश्यक होते. आता उशिराने का होईना हा हक्क मिळणार असल्याने सुखाचे चार घास आमच्या पोटात पडतील. आरक्षण मागणीची आपली लढाई निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे माघार घेऊ नका. कोणी आपल्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, त्यांना थारा देऊ नका." -मनोज जरांगे-पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.