Manoj Jarange Patil: मराठ्यांना हवे हक्काचे, टिकणारे आरक्षण : मनोज जरांगे-पाटील यांचा पुनरुच्चार

नाशिक- पांगरीमधील जाहीर सभेत मांडली आरक्षणामागील भूमिका, मुदतीत पूर्तता करा
Manoj Jarange-Patil lighting the Maratha Kranti Jyot during a public meeting held on Sunday night at the place of the ongoing chain hunger strike near Shri Chhatrapati Shivaji Maharaj statue on Maratha Samaj reservation issue.
Manoj Jarange-Patil lighting the Maratha Kranti Jyot during a public meeting held on Sunday night at the place of the ongoing chain hunger strike near Shri Chhatrapati Shivaji Maharaj statue on Maratha Samaj reservation issue.esakal
Updated on

नाशिक- सिन्नर : मराठा समाजाची गेल्या दोन पिढ्यांची आरक्षणाची मागणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता आरक्षण दिल्याशिवाय सरकारची सुटी नाही. आमच्या हक्काचे आम्हाला कसे देत नाही, ते पाहून घेऊ, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी पांगरी (ता. सिन्नर) आणि नाशिकमधील सभेत दिला.

मराठा आणि कुणबी एकच आहेत, इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण हवे आहे, त्यासाठीच सरकारला महिनाभर नव्हे, ४० दिवसांची मुदत दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Manoj Jarange Patil statement Marathas want rightful lasting reservation at nashik daura)

मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी जनजागृती मोहिमेवर असलेल्या जरांगे-पाटील यांचे रविवारी (ता. ८) नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. पांगरी (ता. सिन्नर) येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर नाशिककडे येताना नाशिक रोड येथेही मराठा समाजातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी रात्री उशिरा त्यांचे आगमन झाले. पुष्पवृष्टी करीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते मराठा क्रांतीची ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थित समाजबांधवांना संबोधित केले.

आमचे उपोषण वास्तव मागणीसाठी आहे. महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज शेती करतो. त्याच्या नोंदी सर्वत्र आहेत. मराठवाड्यात ऊर्दू, फारसी, मोडी अशा विविध भाषांतील कागदपत्रांत या पाच हजार नोंदी आम्ही संकलित केलेल्या आहेत.

त्यामुळे उपोषणावेळी चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला आम्ही चार दिवसांचा कालावधी देण्याबाबत ठाम होतो. मात्र, सातत्याने टिकणारे व कायद्याच्या कसोटीत बसणारे आरक्षण हवे तर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी द्या, असे राज्य सरकारचे प्रतिनिधी मंडळ सांगत होते.

सर्वपक्षीय नेत्यांनी एक महिन्याचा कालावधी देण्याचा ठराव करावा, असा आग्रह धरला. त्यानुसार मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय होऊन सर्वपक्षीय नेत्यांनी विनंती केल्यावर आम्ही ३० नव्हे, तर ४० दिवसांचा कालावधी सरकारला वाढवून दिला आहे.

मात्र, यापुढे हा कालावधी संपल्यावर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.

Manoj Jarange-Patil lighting the Maratha Kranti Jyot during a public meeting held on Sunday night at the place of the ongoing chain hunger strike near Shri Chhatrapati Shivaji Maharaj statue on Maratha Samaj reservation issue.
Manoj Jarange : मंगळवेढ्यात साडेतीन तास उशिरा तरीही उत्स्फूर्त गर्दी

छावा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. विलास पांगारकर यांनी सरकारचा निषेध करीत मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा दिला.

भाजपचे भाऊसाहेब शिंदे, संभाजी ब्रिगेडचे सुभाष कुंभार, कामगार नेते हरिभाऊ तांबे, दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, शिवसेना शिंदे गटाचे शरद शिंदे, प्रा. राजाराम मुंगसे यांनी मनोगत व्यक्त केले. पांगरी येथील मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.

आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठासमोर बसले होते.

आता माघार तेव्हाच घेणार...

मराठवाडा सोडला तर सबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाकडे कुणबी असल्याचे पुरावे सापडतील. लोकांकडे कुणबीचे दाखलेही आहेत. ज्यांना अडचणी येत आहेत, त्यांनी वंशावळ, महसूल कागदपत्रांचा शोध घेणे आवश्यक आहे.

Manoj Jarange-Patil lighting the Maratha Kranti Jyot during a public meeting held on Sunday night at the place of the ongoing chain hunger strike near Shri Chhatrapati Shivaji Maharaj statue on Maratha Samaj reservation issue.
Manoj Jarange Patil : सगळ्या पक्षांसाठी आपल्या बापजाद्यांनी वेळ दिला, पण मराठा आरक्षणावर एकही पक्ष बोलायला तयार नाही

शोध घेतल्यास मराठवाडा पाहता इतर ठिकाणी ओबीसी सवलतींचा लाभ घेणे शक्य होईल, याकडे जरांगे-पाटील यांनी लक्ष वेधले.

कोणाशीही कोपऱ्यात किंवा बंद दारात चर्चा करणार नाही. सरकारने कितीही डाव टाकू द्या, सर्व डाव उधळून लावील. आता मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेल, तेव्हाच माघार घेतली जाईल.

अंतरवेलीला १४ ला मेळावा

सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत १४ ऑक्टोबरला संपणार आहे. या दिवशी मराठा समाजाचा अंतरवाली येथे राज्यस्तरीय मेळावा होईल. या मेळाव्यासाठी सर्वांनी यावे. मराठा समाजातील तरुणांनी आंदोलन करताना कुठेही कायदा हातात घेऊ नये.

तसे झाले तर आपलीच मुले अडचणीत येतील. आरक्षण मागणीसाठी कुणी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करू नये.

आंतरवेलीत मेळाव्यासाठी येणाऱ्या माता माऊलींना सुखरूप त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मराठा युवकांची असेल. मराठा जातीला कुठेही डाग लागेल, असे वर्तन आपल्याकडून व्हायला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange-Patil lighting the Maratha Kranti Jyot during a public meeting held on Sunday night at the place of the ongoing chain hunger strike near Shri Chhatrapati Shivaji Maharaj statue on Maratha Samaj reservation issue.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यात, एकजूट कायम ठेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.