Nashik News: मानोरी खुर्दला मंगळवारपासून शेतीमालाचा लिलाव! लासलगाव बाजार समितीचे सभापतींची माहिती

Lasalgaon Market Committee
Lasalgaon Market Committeeesakal
Updated on

लासलगाव : येथील बाजार समितीच्या मानोरी खुर्द (फाटा) येथे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (ता. १४)पासून भुसार व तेलबिया शेतीमालाच्या लिलावास सुरवात होणार आहे, अशी माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. (Manori Khurdala auction of agricultural products from Tuesday Information about Chairman of Lasalgaon Market Committee Nashik News)

निफाड तालुक्यातील मौजे मानोरी खुर्द, देवगाव, शिरवाडे, वाकद, कानळद, खेडलेझुंगे, कोळगाव, भरवस, वाहेगाव, गोंदेगांव, गोळेगाव या गावांसह येवला, सिन्नर, कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणे सोयीचे व्हावे, यासाठी बाजार समितीने मौजे मानोरी खुर्द येथे तात्पुरते खरेदी-विक्री केंद्र स्थापन केले आहे.

केंद्रावर भुसार व तेलबिया शेतीमाल विक्रीसाठी आणल्यानंतर बाजार समितीच्या नियमाप्रमाणे शेतीमालाचा जाहीर लिलाव होणार आहे. लिलावानंतर इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजनमाप व त्यानंतर रोख चुकवती देण्यात येणार आहे.

Lasalgaon Market Committee
Lakshmi Pujan: विखरणी ग्रामपंचायत कार्यालयात सामूहिक लक्ष्मीपूजन! हिंदू-मुस्लिम ऐक्य जपत दप्तर पूजन

भुसार व तेलबिया शेतीमाल खरेदीस इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तत्काळ परवाना देण्यात येणार असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी त्यांचा भुसार व तेलबिया शेतीमाल १४ नोव्हेंबरपासून लासलगाव बाजार समितीच्या मानोरी खुर्द (फाटा) येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह सदस्य मंडळाने केले आहे.

Lasalgaon Market Committee
Nashik: पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक आधार द्या! सवलती लागू करण्यासह उर्वरित जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.