ठेवीच्या मुद्दयावरून अनेकांचे अर्ज बाद; विद्यमान संचालक मात्र ठरले पात्र

Pimplegaon merchants bank Election Latest Marathi News
Pimplegaon merchants bank Election Latest Marathi Newsesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : जिल्ह्यातील अग्रगण्य व्यापारी बॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव मर्चटस बॅकेच्या रणधुमाळी उडी घेऊ पाहणाऱ्या अनेक इच्छूकांची अर्ज छाननीत दांडी गुल झाली. पिंमकोत ३१ मार्चपूर्वी एक लाख रूपये ठेव असणे बंधनकारक असल्याच्या मुद्‍यावरून अनेकांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीत (Election) नवा ट्विस्ट आला आहे.

विद्यमान संचालक मात्र पात्र ठरल्याने अनेकांच्या भुवय्या उंचविल्या आहेत. ठेवीच्या अटीचा उपविधी सत्ताधाऱ्यांनी सभासदांपासून दडवून ठेवल्याचा आरोप इच्छूकांनी केला आहे. याविरोधात दाद मागणार असल्याचे अपात्र ठरलेले माजी सरपंच महेंद्र गांगुर्डे यांनी इशारा दिला आहे. (Many applications rejected on deposit issue Nashik Latest Marathi News)

पिंपळगांव मर्चट्स बॅकेत गेली पस्तीस वर्षापासून अशोक शाह गटाची निर्विवाद सत्ता आहे. एकगठ्ठा मतदान हाती असल्याने दोन निवडणूक बिनविरोध झाली. इतर वेळी शाह यांच्या गटाने विरोधकांचा सुपडा साफ केला. यंदाही काही इच्छूक निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. पण त्यांचे अर्ज बाद ठरल्याने ही परिस्थिती निर्माण केली गेल्याची चर्चा आहे.

पिंमकोच्या १९ जागांसाठी ७९ अर्ज दाखल झाले होते. त्यातील तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत १६ जागांसाठी आलेल्या अर्जावर आज निफाड येथे छाननी प्रक्रिया झाली. त्यात निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी पोटनियमानुसार उमेदवारीसाठी संस्थेत एक लाख रूपयांची ठेव असणे बंधनकारक आहे.

नसल्यास उमेदवारी अर्ज अपात्र ठरतील असे घोषित केले. त्यामुळे या नियमात न बसणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. यात इच्छूक माजी सरपंच महेंन्द्र गांगुर्डे, जुगलकिशोर राठी, ईश्‍वर बोथरा आदीसह २५ हून अधिक इच्छुकांचा पत्ता कट झाला. यामुळे छाननीवेळी प्रचंड गदारोळ झाला.

प्रबळ दावेदारांच्या अर्जावर फुली मारली गेल्याने विद्यमान संचालकांचे अर्ज संचालकांनी ठेवीचा निकषाचे पालन केल्याने त्यांचे सर्व अर्ज वैध ठरले. गफ्फार शेख यांचा अर्ज एका संस्थेचे थकबाकीदार असल्याने अवैध ठरविण्यात आला.

दिर्घकाळापासून पिंमकोचे संचालक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छूकांना अपात्र ठरविल्याने मोठा धक्का बसला आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांची ही खेळी असल्याच्या उलटसुलट चर्चा शहरात रंगली. सत्ताधारी गटाने मात्र आरोप फेटाळत चर्चा निष्फळ असल्याचे सांगत आहे.

Pimplegaon merchants bank Election Latest Marathi News
Nashik : पाझर तलाव फुटल्याने रस्त्याला भगदाड; निकृष्ट कामाचे पितळ उघड

निवडणूक बिनविरोधच्या दिशेने

प्रकाश गोसावी, सुनंदा जैन, विद्या घोडके हे तीन संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहे. ओबीसी गटाच्या एका जागेसाठी धनंजय गांगुर्डे व महेश चांदवडकर यांचे अर्ज असल्याने चौथी जागा बिनविरोध होण्याची औपचारिकता शिल्लक आहे.

त्यात पुन्हा प्रमुख दावेदारांचेच अर्ज फेटाळले गेल्याने इच्छुकांची संख्या अत्यल्प राहिली आहे. त्यामुळे पिंमकोची निवडणुक तिसऱ्यादा बिनविरोधच्या दिशेने निघाली आहे. उर्वरित पंधरा जागांसाठी २० व्यक्तीचे अर्ज शिल्लक असल्याचे समजते. २८ जुलैपर्यत माघारीची मुदत असल्याने बिनविरोध निवडणूक होणार हे निश्‍चित आहे.

दरम्यान सत्ताधारी गटातून काही विद्ममान संचालकांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता होती. पण आता बहुतांश अर्ज बाद झाल्याने त्यांचे संचालक पद कायम राहणार आहे. शिवाय महेश चांदवडकर, संदीप सुराणा या नवीन चेहऱ्यांची एन्ट्री होऊ शकते.

"सत्ताधारी गटाने रडीचा डाव खेळला आहे. सभासदांच्या निवडणूक लढण्याच्या हक्कावर गदा आणली आहे. सामान्य सभासदांचे अर्ज नाकाराले जात असताना सत्ताधारी गटाचे अर्ज पात्र कसे ठरतात? ठेवी संदर्भातील पोट नियम सामान्य सभासदांपासून दडवून ठेवला आहे. या विरोधात जिल्हा निबंधकांकडे दाद मागणार आहे." - महेंन्द्र गांगुर्डे, सभासद, पिंमको.

"संस्था उपविधी हा सर्वसाधारण सभेत सभासदांपुढे ठेवला जातो. नंतर तो मंजुरीसाठी सहकार विभागाकडे पाठविला जातो. उमेदवारीसाठी आवश्‍यक निकषांची माहिती संबंधितांनी जाणून घेणे गरजेचे आहे. आरोप निराधार आहेत. अशोक शाह यांच्या मुलगा स्वप्निल शाह यांचाही अर्ज याच मुद्द्यावरून नाकारला गेला आहे.आमच्या पारंपारिक विरोध गटाच्या काही इच्छूकांचेही अर्ज वैध ठरले आहेत हेही लक्षात घ्यावे" - सोहनलाल भंडारी, संचालक, पिंमको.

Pimplegaon merchants bank Election Latest Marathi News
Nashik : लासलगाव बाजार समितीत 18 पासून डाळींब लिलाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.