Nashik Rain News : उत्तर महाराष्ट्र कोरडाच! नांदगाव, मालेगाव, येवला, सिन्नरचे शेतकरी संकटात

Akola Farmers waiting for heavy rains
Akola Farmers waiting for heavy rainssakal
Updated on

Nashik Rain News : राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होत असला, तरी उत्तर महाराष्ट्र अद्याप कोरडाच असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगरच्या धरणांमध्ये साठाच नसल्याने शेतकरी संकटात सापडले.

पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी गोदावरीला एकदाही पूर आलेला नाही. जिल्ह्यातील एकूण २४ प्रकल्पांपैकी अनेक धरणांत ५० टक्केही साठा नाही. (many dams do not have even 50 percent storage in district nashik rain news)

त्र्यंबकेश्वर व इगतपुरी भागात पाऊस होत असल्याने गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे.

करंजवण धरण ५६ टक्के, दारणा धरण ९३ टक्के भरल्याने येथून ५५० क्यूसेसने विसर्ग सुरू आहे. मुकणे धरण ७७ टक्के, चणकापूर धरण ७५ टक्के भरल्याने येथून ४७१ क्यूसेसने विसर्ग सुरू आहे. गिरणा धरण ३४ टक्केच भरले.

नाशिक जिल्ह्यात सरासरी ६०३ मिलिमीटर पाऊस होतो. मात्र, जून ते १५ ऑगस्टपर्यंत ३६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरी ६१ टक्के एवढा पाऊस झाल्याने शेतीचा विचार केला तर खरिपाच्या पेरणीचे एकूण क्षेत्र सहा लाख ४१ हजार ७७१ हेक्टर असून, यंदा पेरणी व लागवड झालेले एकूण क्षेत्र पाच लाख ८७ हजार ७५१ हेक्टर म्हणजेच एकूण ९१ टक्के इतके आहे. कांदा लागवड ६६२ हेक्टरवर झाली. जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Akola Farmers waiting for heavy rains
Monsoon Update : राज्यातील टंचाईत वाढ; नगर, सातारा, सांगलीमधील स्थिती गंभीर; गेल्यावर्षीपेक्षा ३३.८ टक्के कमी पाऊस

जळगाव, नंदुरबारमध्येही बिकट परिस्थिती

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३२० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण सात लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यातील पाच लाख ६० हजार क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली. सध्या सर्वत्र पीक परिस्थिती मध्यम स्वरूपाची आहे.

मात्र, पावसाची आवश्यकता आहे. जिल्ह्यात कोणत्याही भागात अद्याप दुष्काळसदृश पीक परिस्थिती नाही. नंदुरबार जिल्ह्यात एकूण पाच मध्यम प्रकल्प आहेत. वीरचक्र शिवण मध्यम प्रकल्प ३० टक्के, शहादा मध्यम प्रकल्प १०० टक्के साठा आहे.

नागण मध्यम प्रकल्प ६६ टक्के, कोरडी मध्यम प्रकल्प २६ टक्के, देहली मध्यम प्रकल्प १०० टक्के असा साठा आहे. ढोंगलघु, अमरावती नाला, चोपडे लघुप्रकल्प, घोटाणे, सुसर या पाच मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के साठा आहे.

Akola Farmers waiting for heavy rains
Monsoon Update : ऑगस्ट महिन्यात मॉन्सूनची स्थिती कशी असणार? IMD कडून अपडेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()