RTE प्रवेशप्रक्रियेपासून निम्‍मे विद्यार्थी दूरच

rte admission
rte admissionesakal
Updated on

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सोडतीत जाहीर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची बुधवार (ता. ३०)पर्यंत मुदत आहे, असे असताना राज्‍यात अद्याप निम्‍मे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेपासून दूरच असल्‍याची स्‍थिती आहे. सोडतीत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झालेली असताना रविवार (ता. २७)पर्यंत २७ हजार ७१७ विद्यार्थ्यांचे तात्‍पुरते प्रवेश (प्रोव्‍हिजनल ॲडमिशन) झालेले आहे. अवघ्या आठ हजार ९८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. (many-students-away-from-RTE-admission-process-nashik-marathi-news)

आरटीई प्रवेशप्रक्रियेपासून निम्‍मे विद्यार्थी दूरच

शैक्षणिक वर्ष २०२१- २२ च्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. बहुतांश शाळांमध्ये ऑनलाइन स्‍वरूपात अध्यापनप्रक्रिया सुरू झालेली आहे, असे असताना आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू असल्‍याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे यंदाच्‍या शैक्षणिक वर्षातही प्रवेशप्रक्रिया प्रभावित झालेली आहे. गेल्‍या ११ जूनपासून प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवार (ता. ३०)पर्यंत प्रवेशाची मुदत दिलेली आहे, असे असूनही निम्‍या विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नसल्याचे चित्र आहे.

राज्‍यात प्रवेश निश्‍चितीचे प्रमाणही अल्प; बुधवारपर्यंत मुदत

राज्‍यात नऊ हजार ४३२ शाळांमध्ये प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ जागा उपलब्‍ध आहेत. या जागांकरिता राज्‍यभरातून दोन लाख २२ हजार ५८४ अर्ज प्राप्त झाले होते. तर सोडतीत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. यापैकी २७ हजार ७१७ विद्यार्थ्यांचे तात्‍पुरते प्रवेश निश्‍चित झालेले आहे व आठ हजार ९८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झालेले आहेत.

प्रतीक्षायादीतील विद्यार्थी रांगेत

प्रवेशाची मुदत संपत असताना आत्तापर्यंतचा प्रतिसाद बघता मुदतवाढ देण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशात प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्यास विलंब होऊ शकतो. त्‍यामुळे असे विद्यार्थी व त्‍यांचे पालक सध्या त्‍यांना प्रवेशाची संधी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

rte admission
कांदा दोन हजार पार; आवक वाढली

जिल्ह्यात ७७० प्रवेश

नाशिक जिल्ह्यात साडेचारशे शाळांमध्ये आरटीईअंतर्गत चार हजार ५४४ जागा उपलब्‍ध आहेत. याकरिता तेरा हजार ३३० अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीत चार हजार २०८ विद्यार्थ्यांची निवड केली होती. त्‍यापैकी एक हजार ३९७ विद्यार्थ्यांचे तात्‍पुरते प्रवेश झाले आहेत. तर ७७० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत.

rte admission
इगतपुरीतील रिसॉर्ट..पावसाळा अन् पार्ट्यावरील छापे चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()