राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. मात्र मराठा समाजाने भुजबळांच्या पाहणी दौऱ्याला जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. आधी भुजबळांना फोन करून आमच्या बांधावर येऊ नका असं सांगण्यात आलं, त्यानंतर ज्या भागात ते गेले त्या भागात त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. तर लासलगावमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Marathi Tajya Batmya)
राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा-ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे छगन भुजबळांच्या पाहणी दौऱ्याला मराठा बांधवांनी जोरदार विरोध केला आहे.
येवला तालुक्यातील नुकसान पाहणी करून भुजबळ निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले होते. यावेळी भुजबळांचा ताफा लासलगाव कोटमगाव मार्गे जात असताना कोटमगाव येथे मराठा समाजाच्या कार्यकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. तसेच ताफा पुढे गेल्यानंतर आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत 'भुजबळ गो बॅक'च्या घोषणा देखील दिल्या होत्या.
'7/12 आमच्या बापाचा, बांधावर येऊ नका', ऑडिओ क्लिप व्हायरल
छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारे एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. 'आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका', असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, मात्र, आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासह सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणाही देण्यात आल्या. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले.(Latest Marathi News)
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये ?
ग्रामस्थ: सोमठाणे देश मधून बोलत आहे, तिथे तुमचा दौरा आहे, सकल मराठा समाजाच्यावतीने भुजबळ साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो येऊ नका, आमच्या गावच्या बांधावर येऊ नका....
छगन भुजबळ: ठिक आहे, बघू काय करायचे ते?
ग्रामस्थ : तुम्ही आले तर वातावरण खराब होऊन जाईल. सर्व गावकऱ्यांची विनंती आहे तुम्ही येऊ नये.
छगन भुजबळ: बरं.बरं...
ग्रामस्थ : जमीनीचा 7/12 आमच्या बापाचा आहे. तुम्हाला व्हिडीओ पाठवला आहे तो बघून घ्या, हात जोडून विनंती आहे येऊ नका.
छगन भुजबळ: असं आहे, मला कोणी म्हटलं या तर मी जाईल, नाही म्हटलं तर बघू...
ग्रामस्थ : आमच्या गावचा ठराव झाला आहे. कोणालाही गावात येऊ द्यायचे नाही त्यामुळे तुम्ही येऊ नका..
छगन भुजबळ: तुम्ही चार लोक म्हणजे ठराव होतो का?
भुजबळांचा ताफा जाताच गोमुत्र शिंपडलं; मराठा संघटनांचं आंदोलन
येवल्यातील सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी भुजबळांचा ताफा जाताच गोमुत्र शिंपडून निषेध नोंदवला. मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे भुजबळांनी त्यांच्या दौऱ्यात बदल केला.
''तुम्ही हुतात्मा स्मारक साफ केलं होतं आणि आमच्या गावचे रस्ते साफ करतो'' असं म्हणत मराठा आंदोलकांनी गोमुत्र शिंपडून निषेध नोंदवला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांना विरोध होताना दिसतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.