Jalna Lathi Charge: लाठीहल्ल्यावरून मराठा संघटना आक्रमक! पळसे, मेहेर चौकात आंदोलन

The entire Maratha community protested in front of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at CBS in protest of the Jalna incident.
The entire Maratha community protested in front of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at CBS in protest of the Jalna incident.esakal
Updated on

Jalna Lathi Charge : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजबांधवाकडून सुरू असलेले उपोषण पोलिसांनी लाठीमारातून चिरडण्याचा प्रयत्न केल्याने त्याविरोधात नाशिक शहरात शनिवारी (ता.२) संतप्त प्रतिसाद मराठा संघटनांकडून उमटले.

मेहेर चौक सिग्नल चौकात आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमा फाडल्या.

टायर जाळण्याच्या प्रयत्नात पोलिसांशी झटापट झाली, तर स्वराज्य संघटनेने सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. जालना येथून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याने नाशिक शहर व जिल्ह्यातही लाठीमाराच्या निषेधार्थ बंद होणार आहे. (Maratha organization aggressive on lathi attack protest at Meher Chowk response to bandh nashik)

जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू असताना पोलिसांकडून विरोध झाला. उपोषणकर्ते ठाम राहिल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.

आंदोलकांनीही आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या. संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटनेकडून आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तिघांचेही फोटो फाडून पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला.

सिग्नल परिसरात दबा धरून बसलेल्या पाच-सहा कार्यकर्ते टायर घेऊन आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांनी टायर जाळणाऱ्ंयाच्या हातून हिसकावले.

त्या वेळी पोलिस व आंदोलनकर्त्यांत झटापट झाली. संघटनेचे प्रफुल्ल वाघ, नितीन रोठे- पाटील, विकी गायधनी, राकेश जगताप यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जालना घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना सरकारने निर्दयपणे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मराठा समाज माफ करणार नाही. शिंदे, फडणवीस, पवार यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. या वेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता.

The entire Maratha community protested in front of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at CBS in protest of the Jalna incident.
Jalna Lathi Charge : 'पोलीसांचा दोष नाही, सरकारच...'; जालन्यातील लाठीमार प्रकरणी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

पळसे ग्रामस्थांचे निषेध आंदोलन

पळसे ग्रामस्थांनी शिवस्मारक येथे जमून घटनेचा निषेध केला. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी, नासाका माजी चेअरमन तानाजी गायधनी, वैभव पतसंस्थेचे श्यामराव गायधनी, प्रमोद गायधनी, मनोज गायधनी, सोमनाथ आगळे, गणेश आगळे, प्रदीप गायधनी, गणपत गायधनी, संजय गायधनी, शिवाजी गायखे, माधव गायधनी आदी उपस्थित होते.

आम आदमी पक्षाचे निवेदन

मराठा उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात आम आदमी पार्टीकडून निषेध करण्यात आला. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले.

गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, पोलिसांवर कारवाई करावी, जखमींना नुकसान भरपाई द्यावी, पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना निलंबित करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

आपचे राज्य मीडियाप्रमुख चंदन पवार, पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे, देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीश उगले- पाटील, दीपक सरोदे, सुमीत शर्मा, गोरख मोहिते, अमोल लांडगे, अल्ताफ शेख, पद्माकर अहिरे, अमित यादव उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The entire Maratha community protested in front of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at CBS in protest of the Jalna incident.
Jalna Maratha Protest Violence: नामपूरला राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

आजच्या बंदला पाठिंबा

मराठा समाजाचे जालना येथील शांततेत चालणारे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज केल्याचा निषेध सकल मराठा समाजाकडून करण्यात आला. सीबीएस येथील शिवस्मारकात सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

३ सप्टेंबरच्या नाशिक बंदला नाशिक सकल मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला. शिवस्मारकात झालेल्या निषेध सभेला राजू देसले, शिवाजी मोरे, केशव गोसावी, उमेश शिंदे, डॉ. रूपेश नाठे,

आशिष हिरे, ज्ञानेश्वर थोरात, नितीन दातीर, सागर पवार, योगेश नाटकर, गणेश कदम, राम खुर्दळ, संजय पडोळ, विशाल वारुळे, संदीप लभडे, सचिन आहिरे, अमित नडगे, प्रफुल्ल पवार, सचिन शिंदे, पुंडलिक बोडके, भारत पिंगळे, दिनेश नरवडे, योगेश कापसे, योगेश गांगुर्डे, यश बच्छाव, तुषार भोसले, भूषण देसले, अजय कडभाने, विशाल कदम, नारायण भोसले, सखाराम गव्हाणे, रतन नवले, ज्ञानेश्वर चव्हाण, कैलास गव्हाणे, बाळू सूरडे, निखिल सातपुते, माधवी पाटील, पुष्पा जगताप, मनोरमा पाटील, सुलोचना गवळी, रागिणी जाधव, निशिगंधा पवार, रोहिणी दळवी आदी उपस्थित होते. आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा स्वराज्य पक्षाकडून जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

- जालना जिल्ह्याच्या एसपींना तत्काळ निलंबित करा.

- मराठा समाजाला आरक्षण द्या.

- घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी.

- सरकारने राजीनामा द्यावा.

The entire Maratha community protested in front of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at CBS in protest of the Jalna incident.
Jalna Maratha Andolan: कोण आहेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.