Maratha Reservation: मराठा ‘इम्पेरिकल डेटा कलेक्शन’ साठी 2600 कर्मचारी! नाशिक मनपाचे काम ठप्प पडण्याची भीती

महापालिका प्रशासनाला मुख्यालयाचे दार बंद करूनच बंधनकारक असलेले इम्पेरिकल डेटा संपादित करावे लागणार आहे.
NMC news
NMC newsesakal
Updated on

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा त्यानंतर शहरात डीप क्लिनिंग स्वच्छता मोहीम दुसरीकडे महापालिकेचे कामकाज सांभाळताना वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याच्या चिंतेत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर आता मराठा समाजाचा इम्पेरिकल डेटा संकलित करण्याचे काम आले आहे.

३१ जानेवारीपर्यंत शासनाला सर्व माहिती सादर करायची आहे. त्यासाठी महापालिकेचे २६०० कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त झाले आहे. महापालिकेकडे एकूण ४८०० कर्मचारी, त्यात दोन हजार सफाई कर्मचारी त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच कामाला लागणार असल्याचे महापालिकेचे कामकाज ठप्प पडण्याची भीती आहे.

त्यामुळे आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांची मदत घेण्याची वेळ आली आहे. परंतु त्यादेखील संपावर गेल्याने महापालिका प्रशासनाला मुख्यालयाचे दार बंद करूनच बंधनकारक असलेले इम्पेरिकल डेटा संपादित करावे लागणार आहे. (Maratha Reservation 2600 Employees for Maratha Empirical Data Collection Fear of stopping work of Nashik NMC news)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण केले. त्या उपोषणात पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने मराठा समाजाचे आंदोलन चर्चेत आले.

जरांगे- पाटील यांनी आंदोलनाची धार तीव्र करताना थेट राज्य सरकारविरोधात दंड थोपटले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आंदोलन तीव्र झाले. राज्य शासन व उपोषणकर्ते जरांगे- पाटील यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या अधिक वाढल्या.

अखेरीस महिना, दीड महिन्याच्या कालावधी नंतर जरांगे- पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी राज्य शासनाने कुणबी नोंदीचा शोध घेण्याचे फर्मान शासकीय यंत्रणेला सोडले.

एकीकडे आरक्षणासाठी माहिती संकलित केली जात असताना दुसरीकडे जरांगे-पाटील यांचे आंदोलनाची वेळ जवळ आल्याने राज्य शासनाने मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा इम्पेरिकल डेटा संकलित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला केल्या व जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरी भागात महापालिकेला माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेचे २६०० कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन माहिती संकलित करायची आहे.

त्यापूर्वी प्रशिक्षण होईल. २० जानेवारीला अधिकाऱ्यांचे, तर २१ व २२ जानेवारीला प्रगणकांचे प्रशिक्षण होईल. प्रगणकांची संख्या लक्षात घेता महापालिकेचे संपूर्ण कामकाज ठप्प होण्याची भीती आहे.

NMC news
Maratha Reservation: मनोज जरांगे आक्रमक! तर सरकारने दिली मराठा समाजासाठी घेतलेल्या 20 निर्णयांची माहिती

अंगणवाडी सेविकांची शोधमोहीम

महापालिकेकडे जवळपास सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या ४८०० आहेत, त्यात सुमारे २००० सफाई कर्मचारी आहे. २६०० प्रगणक घरोघरी जाऊन सामाजिक व आर्थिक परिस्थिती अवगत करून घेणार असल्याने प्रत्यक्षात कामावर २०० कर्मचारी राहतील.

त्यामुळे आशा वर्कर अंगणवाडी सेविकांची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यातील टेक्नो सेव्ही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु ९ जानेवारीपासून संपावर असल्याने शोधाशोध सुरू झाली आहे.

माहितीपत्रक भरण्यासाठी १९ मिनिटे

जवळपास १५० हून अधिक प्रश्‍नावली पर्यायी स्वरूपात आहे. कुटुंबाला शिष्यवृत्ती मिळते का, कुटुंबात वैद्यकीय, इंजिनिअरिंग का घेतले नाही, मुलींनी शाळा सोडण्याची कारणे, निवासाचा प्रकार, ग्रामीण की शहरी भागात राहतात, गावाला जाण्यासाठी रस्ते आहेत का, नदी असल्यास त्यावर पूल आहे का, पूर्वजांचे मुळ निवासस्थान, जातीचा पारंपरिक व्यवसाय आदी प्रकारचे प्रश्‍न आहेत.

प्रश्‍नावली सोडविताना साधारण दहा मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे सात दिवसात संपूर्ण मराठा समाजाची माहिती संकलित होवू शकते का, असा प्रश्‍न प्रश्‍नावली पाहिल्यानंतर निर्माण होतो.

NMC news
Maratha Reservation: मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं; मनोज जरांगेंचे डोळे पाणावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()