सटाणा : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सटाणा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांसह सर्व घटकांनी व्यवहार बंद ठेवत मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, अशी मागणी केली.
दरम्यान, तालुक्यातील विविध गावांत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन छेडण्यात आले. (Maratha Reservation Andolan Shutdown of all elements including traders in Satana nashik)
नऊ दिवसांपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी उपोषण, रास्ता रोको, बंद आदी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. सटाणा शहर व तालुक्यात विविध ठिकाणी साखळी उपोषणे सुरू आहे.
जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, शेतकरी, हमाल, मापारी, बाजार समिती प्रशासनाने समितीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रॅली काढली. शिवतीर्थाजवळ सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला.
शहरात कृषी सेवा केंद्र संचालकांनीही व्यवहार बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला. बागलाण तालुका सरपंच परिषदेतर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात साखळी उपोषण करण्यात आले.
नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व करंजाड उपबाजार समितीतर्फेही आज सर्व व्यवहार बंद ठेवत आरक्षणासाठी शेतकरी, व्यापारी, मापारी, हमाल यांनी उपोषणास पाठिंबा दिली.
तालुक्यातील लखमापूर, ब्राह्मगावात सकल मराठा बांधवांनी एकत्र येत जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत साखळी उपोषण केले.
डांगसौंदाणेत कॅन्डल मार्च
डांगसौंदाणे (ता. बागलाण) येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला.
श्रीराम मंदिर चौक येथून निघालेल्या मार्चमध्ये सकल मराठा बांधवांसह इतर समाज बांधवांनी सहभाग घेतला. पेठ गल्ली, विश्वकर्मा चौक, बाजारपेठमार्गे डांगसौंदाणे शिवतीर्थावर मोर्चाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.