Maratha Reservation: मुंडन, श्राद्ध, तिरड्या जाळत रस्ता रोको; रास्ते सुरेगावला मराठा समाज आक्रमक

Maratha brothers staged protest by burning tires on Nashik-Chhatrapati Sambhajinagar highway on Wednesday & Protesters giving statement of demands to the police
Maratha brothers staged protest by burning tires on Nashik-Chhatrapati Sambhajinagar highway on Wednesday & Protesters giving statement of demands to the policeesakal
Updated on

येवला : आरक्षणाच्या मागणीसह मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रस्ते सुरेगाव येथे बुधवारी (ता. १) तरुण व ग्रामस्थांनी आक्रमक होऊन नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करून राज्य शासनाचा निषेध केला.

संताप व्यक्त करत विविध मंत्री व विरोध करणाऱ्या नेत्यांची प्रतीकात्मक तिरडी जाळत श्राद्ध घालून युवकांनी मुंडनही केले. (Maratha Reservation Block road by burning mundan shraddha tirdya On way to Suregav Maratha community aggressive nashik)

सुरेगाव रस्ता येथे आरक्षणासाठी मराठा तरुणांनी २५ ऑक्टोबरपासून प्राणांतिक उपोषण सुरू केले असून, प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्याने आक्रमक होऊन बुधवारी सकाळी सकल मराठा समाजाने रस्ता रोको, आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांची तिरडी काढून, श्राद्ध घालून, मुंडन आंदोलन केले.

सुमारे दीड ते दोन तास रस्ता अडवून रस्त्यावर टायर जाळण्यात आले. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत दररोज सकाळी नऊ ते दहा या वेळेत नाशिक- छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर रास्ते सुरेगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे आंदोलक विजय पठाडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व सहकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढून रस्ता रोको आंदोलन थांबविले.

प्राणांतिक उपोषणकर्ते विजय पठाडे यांनी आमच्या भावना सरकारकडे पाठवा, प्रांत, तहसीलदारांनी उपोषणाची दखल घेऊन आमच्या मागण्या शासन दरबारी मांडा, अशी विनंती केली.

Maratha brothers staged protest by burning tires on Nashik-Chhatrapati Sambhajinagar highway on Wednesday & Protesters giving statement of demands to the police
Maratha Reservation: "आंदोलनाची तीव्रता कमी करायची असेल तर..."; मराठा आरक्षण प्रकरणी रामदास आठवले करणार मध्यस्थी

उपोषणामुळे आंदोलक वाल्मिक मगर, पंकज चव्हाण यांची तब्येत खालावल्याने त्यांना येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उपचारादरम्यान रुगणांची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार पठाडे यांनी केली आहे.

आंदोलनात वाल्मीक मगर, विक्रम मगर, किरण मगर, सोमनाथ भागवत, सोमनाथ खैरनार, गणेश बहादुरे, मच्छिंद्र उसरे, गणेश तुपे, बाळासाहेब नाईकवाडे आदींनी मुंडन करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला.

आंदोलनात नंदू ढमाले, राजू पठाण, वनराज पगारे, प्रशांत भोसले, तुकाराम पवार, राजेंद्र भोसले, साईनाथ, अमोल चव्हाण, पंकज चव्हाण, देविदास चव्हाण, अमोल ढमाले, भाऊराव आहेर, मनोज कापसे, दादा नाईकवाडे, मेहनत कापसे, यश कोकाटे, साजन मगर, रावसाहेब मगर, सचिन मगर, वैभव शेळके, अतुल भागवत, सुदाम भागवत, संभाजी ढमाले, प्रदीप ढमाले, गणेश ढमाले, बाळू वासने, राहुल मगर, बापू मोरे, संदीप मोरे, विकास मोरे, ईश्वर सोमासे, राजू ढमाले, विजय ढमाले, बिपिन ढमाले, आबा सोमासे, भगवान सोमासे, राजेंद्र जाधव, रामभाऊ डोंगरे, अनिल कदम आदी सहभागी झाले होते.

Maratha brothers staged protest by burning tires on Nashik-Chhatrapati Sambhajinagar highway on Wednesday & Protesters giving statement of demands to the police
Maratha Reservation: आंदोलनामुळे विद्यार्थ्यांनी घेतला धसका! बसफेऱ्या घटल्याने दिवाळीला घरी येणाऱ्यांच्या चिंतेत भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.