Maratha Reservation : 'आपला दणका लय अवघड असतो, मग सुट्टी नाय...!' भुजबळांच्या येवल्यात जावून जरांगेंचा हल्ला

जालन्यातील आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत.
NCP Chhagan Bhujbal and manoj jarange patil
NCP Chhagan Bhujbal and manoj jarange patilEsakal
Updated on

- अजिंक्य धायगुडे

येवला - जालन्यातील आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. सोमवारी ते नाशिक जिल्ह्यातील येवला येथे बोलत होते. छगन भुजबळांच्या मराठा आरक्षण प्रश्नावरील भूमिकेबाबत त्यांनी भाष्य केलं.

जरांगे म्हणाले, विरोध काय करता आम्ही केलेल्या उपकाराची जाण ठेवा. आमच्या उपकाराची एकदातरी परत फेड करा. भुजबळ म्हणतात ओबीसीमध्ये मराठा सामाज्याला घुसवू नका. भुजबळांच्या गावात आलोय म्हणून त्यांच्याबद्दल बोलतोय असं नाही. मी खरं बोलणारा आहे, मी कधीही खोटे आरोप करत नाही. मी गेले चार दिवस भुजबळांबद्दल बोललो नाही.

भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले माझा आणि मराठा आरक्षणाचा संबंध नाही. मी आजच भुजबळांचे नाव घेतेले आहे, ते ही समजून सांगण्यासाठी टीका केलेली नाही. जर भुजबळ म्हणाले, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, तर मग मी उठलोच म्हणून समजायचं असा इशारा देखील जरांगेंनी भुजबळांना दिला.

NCP Chhagan Bhujbal and manoj jarange patil
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

'तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरुद्ध बोलायचं नाही, आम्ही सुद्धा बोलणार नाही. पण तुम्ही बोलले तर आपला दणका लय अवघड असतो. मग सुट्टी नाही, मी जाहीर सांगतो ओबीसी नेते आणि भुजबळांना आमच्या पाच लोकांनी तरी मतदान केले असेल.. या ओबीसी नेत्यांनी म्हणायला पाहिजे, मराठा समाजाचे उपकार फेडायचे आहेत म्हणून मराठा आरक्षणासाठी मीच लढायला चालू करतो. असे म्हणायचं सोडून तुमच्यामध्ये मराठ्यांबद्दल द्वेष दिसून येतोय.''

NCP Chhagan Bhujbal and manoj jarange patil
Bharat Gogawale : ''राजकारणात काहीही होऊ शकतं'', अदिती अन् सुनील तटकरेंच्या भेटीनंतर गोगावले थेटच बोलले...

जरांगे पुढे म्हणाले की, मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात माती कालवू नका.. तुम्ही त्यांच्याकडे एकदातरी वेदनेने बघा; मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं तर ओबीसींचे कमी होईल, असं ओबीसी नेत्यांना वाटतेय परंतु आमची मागणी आहे, सरसकट मराठा सामाज्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. त्यामुळे सर्वांनी या लढ्यात एकत्रित यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.