Maratha Reservation : मराठा आरक्षणविरुद्ध वक्तव्याने भुजबळांचा पाय खोलात; संजय पवारांनीही सोडली साथ

maratha reservation Sanjay Pawar also left Bhujbal support nashik news gbp00
maratha reservation Sanjay Pawar also left Bhujbal support nashik news gbp00Esakal
Updated on

Maratha Reservation : वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना आता मराठा आरक्षणाविरोधी वक्तव्यांनी घेरले आहे. मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही; पण ओबीसी प्रवर्गात मराठ्यांना आरक्षण नको, अशी त्यांची भावना जिल्ह्यातील नेत्यांना आवडलेली नाही.

परिणामी, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांच्यापाठोपाठ मनमाड बाजार समितीचे विद्यमान सभापती तथा माजी आमदार संजय पवार यांनीही भुजबळांची साथ सोडली आहे. (maratha reservation Sanjay Pawar also left Bhujbal support nashik news)

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मंत्री भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री झाले. अनपेक्षितरीत्या मिळालेली सत्ता आणि त्याबरोबरचे मंत्रिपद यामुळे अडीच वर्षांच्या या कार्यकाळात भुजबळांनी जिल्ह्यावरील आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली. तेव्हाही अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदच मिळाले होते. परंतु, पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर त्यांनी आपली हुकूमत गाजवली.

याच निधीवाटपावरून नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना थेट आव्हान दिले होते. हा विषय थेट न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्याचा निर्णय होण्यापूर्वीच राज्यात सत्तांतर झाले आणि भुजबळांपूर्वी आमदार कांदे हे सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे आमदार कांदेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यताही बळावली होती. पण, कालांतराने अजित पवार गटानेही सत्तेची वाट निवडल्यावर कांदेंचे स्वप्न हवेतच विरले. मात्र, दोघांमधील द्वंद्व आजही कायम असल्याचे दिसून येते.

मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत भुजबळांनी स्वतंत्र पॅनल निर्माण करून आमदार कांदेंना आव्हान दिले. विशेष म्हणजे नांदगाव मतदारसंघाचे पाच माजी आमदार विरुद्ध विद्यमान आमदार अशी लढत रंगली होती. यात मनमाड बाजार समितीत १५ पैकी १२ जागा जिंकत भुजबळ गटाने आमदारांना पराभवाची धूळ चारली. बाजार समितीचा कारभार सुरू झाला. विजयात सिंहाचा वाटा उचलणारे माजी आमदार संजय पवार यांना सभापतिपद देण्यात आले.

पहिल्याच सर्वसाधारण सभेपासून भुजबळांच्या निकटवर्तीयांनी संजय पवारांवर आपली हुकूमत गाजविण्यास प्रारंभ केला. निवडणुकीनंतर तिसरी सर्वसाधारण सभा पार पडण्यापूर्वीच भुजबळ समर्थकांच्या कुरबुरी सुरू झाल्या. त्या थेट भुजबळांपर्यंत पोहोचल्या आणि यातूनच संजय पवार यांची नाराजी पुढे आली.

maratha reservation Sanjay Pawar also left Bhujbal support nashik news gbp00
Maratha Reservation : समाजाच्या भावनांशी खेळ; जरांगेंचा आरोप, मोदींनी शब्दही काढला नसल्याची खंत

राजकारणाचा बळी ठरण्यापेक्षा भुजबळांना ‘जय महाराष्ट्र’ करून संजय पवार बाहेर पडले. पवारांची ही नाराजी ओळखून आमदार कांदेंनी त्यांना जवळ केल्याचे बोलले जाते. अर्थात, पवारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली, तरी आमदार कांदे यांच्याबरोबरच ते जातील, अशी अटकळ आता बांधली जात आहे.

अशीच काहीशी परिस्थिती येवला मतदारसंघात दिसून येते. लासलगावचा तालुका निफाड असला, तरी मतदारसंघ येवला असल्याने येथील सभापती निवडण्यात भुजबळांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर माजी सभापती जयदत्त होळकरांनाही भुजबळांनी बाजूला सारल्याने त्यांची नाराजी असणे स्वाभाविक होते.

त्यांनीही मराठा आरक्षणाचा धागा पकडून ‘राष्ट्रवादी’च्या सर्व पदांचा राजीनामा देऊन भुजबळांची साथ सोडली. भुजबळांची भूमिका पटली नाही, हा धागा सर्वसामान्य जनतेला न पटण्यासारखा असला, तरी त्याला राजकीय रंग आता हळूहळू येऊ लागला आहे.

एक पवार आले, तर दुसऱ्यांचे काय?

नांदगावचे माजी आमदार संजय पवार हे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याबरोबर गेल्यास पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांचे काय? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. राजेंद्र पवारांनी नागापूर ग्रामपंचायतीची निवडणूक संजय पवार गटाच्या विरोधात लढवली होती. दोन भावांमध्ये फारसे सौख्य नसल्यानेच राजकीय वाटा वेगवेगळ्या होत्या. आता एक पवार आले, तर दुसऱ्या पवारांचे काय होईल, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

maratha reservation Sanjay Pawar also left Bhujbal support nashik news gbp00
Maratha Reservation: आठवलेंचा सदावर्तेंना सबुरीचा सल्ला! म्हणाले, सर्वच मराठ्यांना आरक्षण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()