Nashik News : गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांचा मंगळवारी दिल्लीत मोर्चा!

Morcha
Morchaesakal
Updated on

नाशिक : गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करा, मोबदला वाढ करा यांसह प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (ता.२८) देशव्यापी गट प्रवर्तक व आशा व गट प्रवर्तक चा दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक व आशा संघटना आयटकच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून आशा कर्मचारी रवाना होत आहे. अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले यांनी दिली. (March of group promoters and Asha employees in Delhi on Tuesday Nashik News)

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्यावतीने नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत, त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या प्रकरणी संसदेत आवाज उठविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी २००५ साली राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान सुरू केले.

सध्या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुमारे ८ लक्ष आशा स्वयंसेविका व सुमारे ४० हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. कामाच्या बदल्यात त्यांना देण्यात येणारा मोबदला अत्यंत कमी आहे. त्यांना प्रवास भत्ता बरोबर कामाचा मोबदला किमान वेतन दिले पाहिजे.

मोफत काम करून घेणे बंद करा.गटप्रवर्तकांना व आशा स्वयंसेविकांना मिळणारा मोबदला दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यांना वेठबिगारासारखे राबविले जात आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना कोविड १९ च्या काळांत केलेल्या कामाची दखल जागतिक आरोग्य संस्थेने घेतली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Morcha
Nashik News: नाशिकमध्ये परकीय गुंतवणुकीचे शुभसंकेत! कॅमेरूनच्या उद्योजकाचा 3 कंपन्यांशी गुंतवणूकविषयक चर्चा

ग्लोबल लिडर अवॉर्ड २०२२ साठी भारतातल्या आशा स्वयंसेविकांची निवड केली होती. गटप्रवर्तकांना तृतीय श्रेणी देऊन व आशा स्वयंसेविकांना चतुर्थ श्रेणी देऊन कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आहे. त्यांना कायम करण्याचा निर्णय घ्यावा.

२०१८ पासून गट प्रवर्तक व आशा च्या मोबदल्यात केंद्र सरकारने वाढ झाली नाही. कोरोना योध्यांना किमान वेतन देऊन सन्मान करावा. गटप्रवर्तकांना दरमहा २६ हजार रुपये, अधिक प्रवास भत्ता द्या व आशा स्वयंसेविकांना दरमहा २४ हजार रुपये त्वरित द्या, अशी मागणी आयटक संलग्न अखिल भारतीय आशा व गट प्रवर्तक फेडरेशन करीत आहोत.

या साठी मंगळवारी दिल्ली येथील जंतर मंतर येथे देशभरातील आशा व गट प्रवर्तक एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.

Morcha
Nashik News: पुनर्नियोजनातील अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेला ब्रेक? कांदेंच्या तक्रारीनंतर ZP प्रशासन बॅकफुटवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.