Nashik News: पावसाने विश्रांती घेताच फुलली बाजारपेठ!

The market was overflowing with citizens out shopping
The market was overflowing with citizens out shoppingesakal
Updated on

Nashik News : पावसाने विश्रांती घेताच रविवारी (ता. ३०) शहरातील मुख्य बाजारपेठ फुलून निघाली. प्रत्येक व्यावसायिकांकडे ग्राहकांची गर्दी झाली होती. व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले. (market boomed crowded after rain break Nashik News)

शहरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. अनेकांची कामे खोळंबली होती. सर्वाधिक परिणाम बाजारपेठेवर झालेला दिसून आला. पाऊस पडत असल्याने नागरिकांनी खरेदी करणे टाळत बाजारपेठेकडे पाठ केली होती.

तुरळक ग्राहक बाजारपेठेत दिसून येत होते. विविध वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहक नसल्याने शुकशुकाट बघायला मिळत होता. रविवारी बऱ्याच दिवसांनंतर पावसाने विश्रांती घेतली.

थांबलेला पाऊस आणि रविवारच्या सुटीचे औचित्य साधत नागरिकांनी खरेदीसाठी घराबाहेर पडत बाजारपेठेत गर्दी केली होती. मेन रोड, शालिमार, दहीपूल परिसर, कानडे मारुती लेन, भद्रकाली मार्केट असे विविध मुख्य मार्केट नागरिकांनी फुलून गेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The market was overflowing with citizens out shopping
Nashik Rain Update: बोरखिंड, कोनांबे धरण ओव्हरफ्लो! शेतकरी सुखावला

प्रत्येक दुकानात आणि दुकानात बाहेर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. पावसामुळे व्यावसायिकांच्या झालेल्या सक्तीच्या विश्रांतीनंतर रविवारी फुलून निघालेल्या बाजारपेठ्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.

पावसाळी वस्तू, पादत्राणे, कपडे याशिवाय धोंड्याच्या महिन्यानिमित्ताने होणाऱ्या विविध प्रकारच्या खरेदीस जोर आला होता. दिवसभर नागरिकांची बाजारपेठेत झालेल्या गर्दीत सायंकाळी आणखीनच भर पडली होती.

The market was overflowing with citizens out shopping
Adhik Maas 2023: भाविकांमध्ये दर्शनासाठी उत्साह! दुसऱ्या दिवशीही स्नानासाठी भाविकांची गर्दी, मंदिरे फुलली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.