Market Committee Election : देवळ्यात 8 जागा बिनविरोध

Market Committee election
Market Committee electionesakal
Updated on

Market Committee Election : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित दहा जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत.

यात सोसायटी गटाच्या सात जागांसाठी १३ उमेदवार असून, व्यापारी गटातील दोन जागांसाठी तीन व हमाल मापारी गटात एका जागेसाठी समोरासमोर लढत होत आहे. (Market Committee Election 8 unopposed seats in deola nashik news)

या निवडणुकीत दोन पॅनल होतील अशी शक्यता वर्तविली गेल्याने सुरवातीला १८ जागांसाठी तब्बल १२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे एक पॅनल, तर राष्ट्रवादीचे योगेश आहेर व मविप्रच्या आजीमाजी संचालकंचे दुसरे पॅनल होईल अशी सर्वत्र चर्चा होती.

मात्र, श्री. आहेर यांनी आगामी २०२४ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांसह एकच पॅनल केले. मात्र, काही नाराज समर्थकांनीच त्यांच्याविरूद्ध दंड थोपटल्याने निवडणूक होत आहे.

या दरम्यान ग्रामपंचायत गटातील चार, सोसायटी महिला गटातील दोन, इतर मागासवर्ग एक, विजाभज एक अशा एकूण आठ जागा बिनविरोध झाल्या. सोसायटीच्या सर्वसाधारण सात जागांसाठी वाटाघाटी सुरू असताना तिढा न सुटल्याने कार्यकर्ते नाराज झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee election
PM Awas Yojana : नगर विकास विभागाकडून झोपडपट्टी नियमितीकरण प्रक्रिया

सहा उमेदवारांनी माघारी न घेतल्याने त्या ठिकाणी निवडणूक होत आहे. केदा आहेर व योगेश आहेर यांनी तयार केलेल्या शेतकरी विकास पॅनलपुढे उर्वरित तीन सर्व सामान्य शेतकऱ्यांनी लोकमान्य शेतकरी पॅनल उभे करत आव्हान दिले आहे.

त्यामुळे आता शिवाजी आहिरे, योगेश आहेर, अभिजित निकम, भाऊसाहेब पगार, अभिमन पवार, शिवाजीराव पवार, विजय सोनवणे, महेंद्र आहेर, शशिकांत निकम, वसंत सुर्यवंशी, अमोल आहेर (अपक्ष), निंबा धामणे, संजय शिंदे, विजय आहेर, भाऊराव नवले (अपक्ष) हे निवडणुक रिंगणात आहेत.

Market Committee election
Mahavitaran Rate Hike : बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक! महावितरणकडून महागाईच्या आगीत तेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.