लखमापुर (जि. नाशिक) : दिंडोरी बाजार समितीची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका गटाने तयारी केली असतानाच, अन्य एका गटाने मात्र त्यांना आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीच राष्ट्रवादीला शह देणार, की भाजप- शिवसेना ठाकरे, शिंदे गटांसह सर्वच विरोधक एकत्र येत आव्हान देणार, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. (Market Committee Election Challenge to NCP in Dindori from within party itself Will opposition come together nashik news)
गेल्यावेळी बाजार समिती निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली होती. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले होते. त्यापूर्वी शिवसेना- भाजपने एकत्र येत अनेक वेळा शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.
अशा परिस्थितीत गेल्यावेळी मात्र बिनविरोध निवडणुकीत काही कार्यकर्त्यांचा बाजार समितीत प्रवेश झाला. गावोगावी इच्छुकांची मोठी संख्या असून, काहींनी समाज माध्यमात उघडपणे उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
विद्यमान अध्यक्ष दत्तात्रेय पाटील हे सर्वांना सोबत घेत पुन्हा निवडणुकीच्या तयारीत आहेत. विकासाभिमुख कामाच्या जोरावर पुन्हा संधी मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा इरादा केला आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटानेही चाचपणी करत निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
सर्वपक्षीय विरोधकांना एकत्र करण्याच्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी सर्व विरोधकांना एकत्र करत सक्षम पॅनल करण्याचे सूतोवाच केले आहे. तर राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ, गंगाधर निखाडे, प्रशांत कड यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सर्वपक्षीय पॅनल करण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
आजी-माजी आमदारांची भूमिका महत्त्वाची
बाजार समितीच्या निवडणुकीत प्रामुख्याने सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य मतदार असून, त्यांच्यावर आजी-माजी आमदारांचा प्रभाव असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंतर्गत मतभेद दूर करतात की नाही, यावर बरेच काही अवलंबून असेल.
तालुक्यात शिवसेना- भाजपमध्ये स्थानिक पातळीवर सख्य असले, तरी राज्य पातळीवरील वादामुळे येथेही मतभिन्नता दिसत आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी होणार का याचीही उत्सूकता असणार आहे.
"दिंडोरी बाजार समितीत विकासाभिमुख कामे झाली असून, दिंडोरी- वणी येथे मोठ्या प्रमाणात जागा मिळवत बाजार सुरू केला आहे. विविध उपबाजार सुरू आहेत. शेतकरी, व्यापारी यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, दिंडोरी बाजार समितीचा नावलौकिक वाढला आहे." -दत्तात्रेय पाटील, माजी सभापती
"दिंडोरी बाजार समितीत पाहिजे तेवढे शेतकरी हिताची कामे, बाजाराचा विस्तार झालेला नाही. शेतकऱ्यांना आपला माल पिंपळगाव बसवंत व नाशिकला न्यावा लागतो. सर्वपक्षीयांना एकत्र करत सक्षम पॅनल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत.'
-कैलास मवाळ, माजी स्वीकृत संचालक
दृष्टिक्षेपात मतदार संख्या
* सोसायटी : ७०४
* ग्रामपंचायत : १११७
* व्यापारी : ४५
* हमाल- मापारी : ५०
* एकूण : एक हजार ९१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.