Market Committee Election : माघारीसाठी काउंटडाउन सुरू; मनधरणीसाठी नेत्यांच्या बैठकांना जोर

market committee elections
market committee electionsesakal
Updated on

Market Committee Election : जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुक प्रक्रियेत आता माघारीसाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. दोनच दिवस शिल्लक असल्याने पॅनल नेत्यांकडून इच्छुकांची मनधरणी सुरू आहे.

याकरिता रात्रीच्या बैठकांना जोर आल्याचे बघावयास मिळत आहे. दुसरीकडे बहुतांश बाजार समितीतील नेत्यांचे पॅनल अंतिम टप्यात आले असून, गुरूवारी (ता. २०) माघारीनंतर पॅनल जाहीर करण्याची तयारी केली आहे. (Market Committee Election Countdown begins for withdrawal Meetings of leaders for protest emphasized nashik news)

नाशिकसह दिंडोरी, कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, घोटी या बाजार समित्यांची रणधुमाळी सुरू आहे. यंदा सर्व बाजार समित्यांसाठी तब्बल दोन हजार २७७ अर्ज दाखल झाले आहेत.

बाद अर्जांवर अपील दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर माघारीस सुरवात झाली आहे. मात्र, एकाही बाजार समितीत प्रमुख माघारी झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी अन्‌ विरोधकांकडूनही माघारीसाठी फिल्डींग लावली जात आहे.

अनेक ठिकाणी दबावतंत्राचा वापर, तर काही ठिकाणी तडजोडीही सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने मनधरणी, समजूत काढण्यासाठी पॅनेल नेत्यांना कसरत करावी लागत आहे.

दिवसभर प्रचार सभा घेऊन सायंकाळी, रात्री बैठका घेऊन इच्छुकांची गावोगावी समजूत काढली जात असल्याचे चित्र सर्वच तालुक्यांमध्ये दिसत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

market committee elections
ZP Fund Expenditure : जिल्हा परिषदेत वाढणार यंदा निधी खर्चाचा टक्का!

दरम्यान, देवळा बाजार समिती वगळता कोठेही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न झालेले नाही. देवळा बाजार समितीत बिनविरोधसाठी बैठक झाली. प्रत्यक्षात उमेदवार माघार घेतात किंवा नाही, यासाठी गुरूवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

इतर बाजार समित्यांमध्ये मात्र प्रामुख्याने सत्ताधारी विरूद्ध विरोधक असे पॅनल उतरविले जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यासाठी नेत्यांनी बहुतांश उमेदवारदेखील निश्‍चित केले असल्याचे बोलले जात आहे.

एका जागेसाठी दोन अथवा तीन प्रमुख दावेदार असलेल्या ठिकाणी मात्र निर्णय होत नसल्याने तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी स्थानिक नेत्यांची कसरत सुरू आहे.

market committee elections
Nashik ZP News: बंधारे दुरूस्तीचे काम थेट नगर जिल्ह्यातील ठेकेदाराला! ‘फाईल’ वादात सापडण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()