Market Committee Election : गावोगावी बैठकांना जोर, मन वळविण्याची कसरत

Market Committee nashik
Market Committee nashikesakal
Updated on

Market Committee Election : जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. छाननीत १५३ अर्ज अवैध ठरविण्यात आले. दोन हजार २७७ अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता माघारीसाठी अनेकांची मने वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Market Committee Election Efforts are being made for candidates to not to take part in election nashik news)

इच्छुकांची संख्या मोठी असल्याने स्थानिक नेतृत्वाची मोठी कसरत होत आहे. पॅनल नेत्यांकडून गावोगावी बैठका घेऊन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. लढतीदरम्यान अडचणीचे ठरणाऱ्या उमेदवारांना शोधले जात आहे.

जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांची निवडणूकप्रक्रिया सुरू असून, २५२ जागांसाठी विक्रमी दोन हजार ४२० अर्ज प्राप्त झाले होते. यात सोसायटी गटात एक हजार ४६१, ग्रामपंचायत गटात ६७८, व्यापारी गटात १८३, हमाल मापारी गटातील ९८ अर्जांचा समावेश होता. प्राप्त अर्जांची छाननीप्रक्रिया पार पडली आहे. छाननीत एकूण १५३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

त्यामुळे २५२ जागांसाठी दोन हजार २७७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. याविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे काही अपील प्राप्त झाले आहेत. यावर पुढील आठवड्यात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Market Committee nashik
Water Scarcity : अल निनोच्या धसक्याने यंदा 30 दिवसांसाठी जादा पाणीकपात!

सर्वच बाजार समितींमध्ये चुरशीच्या निवडणुका होतील, हे जवळपास स्पष्टच आहे. माघारीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हा कालावधी मोठा असल्याने पॅनल नेत्यांनी गावोगावी बैठक घेण्यास सुरवात केली आहे. तालुक्यातील दोन्ही गटांकडून प्रचारसभा घेत, संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.

त्यामुळे गावागावांमध्ये निवडणुकांचा धुरळा दिसत आहे. दिवसभर बैठका झाल्यानंतर सायंकाळी इच्छुकांची उमेदवारी फिल्डिंग सुरू असल्याचे चित्र प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. त्यासाठी रात्रीच्या भेटीगाठीचे सत्र वाढले आहे. पॅनल नेत्यांकडून काही उमेदवारांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत.

यात माघारीसाठी साकडे घातले जात असल्याचे बघावयास मिळत आहे. इच्छुकांमध्ये यंदा तरुणाईची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांना पॅनलमध्ये घेण्याकडे अनेकांचा कल दिसत आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देताना जुने चेहरे नाराज होऊ नये, याची काळजीदेखील नेत्यांकडून घेतली जात आहे.

Market Committee nashik
Nashik News : सिन्नर- शिर्डी मार्गावरील टोलचा वाजला ढोल; वाहनधारकांना भुर्दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.