Market Committee Election : पिंपळगावला कदम बंधूमध्ये जुंपली; राजकीय लढाई मुद्द्यांवरून गुद्द्यावर

Market Committee Election fight between yatin kadam and anil kadam during voting count nashik news
Market Committee Election fight between yatin kadam and anil kadam during voting count nashik newsesakal
Updated on

Nashik News : ओझरच्या कदम घराण्याच्या युवापिढीचा राजकीय संघर्ष आता हातघाईवर आलेला दिसतो. माजी आमदार अनिल कदम व माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्यातील राजकीय मुद्दयाची लढाई आज पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत गुद्दयावर येताना दिसली. (Market Committee Election fight between yatin kadam and anil kadam during voting count nashik news)

मतमोजणी दरम्यान अनिल कदम व यतीन कदम यांच्या फिल्मी अन् फ्रि स्टाईल हाणामारी झुंपली. पिंपळगाव बाजार समिती मतमोजणी दरम्यान कदम बंधूंमधील राजकीय संघर्षाचा राडयाचा व्हायरल झालेला व्हिडोओ पाहून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. त्यानंतर सामंजंस्य दाखवत दोघांनी त्या वादावर पडदा टाकला.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या निफाड तालुक्यातील ओझरच्या कदम घराण्यातील वाद गेली पंधरा वर्षापासून धुमसत आहे. माजी आमदार अनिल कदम व माजी आमदार मंदाकिनी कदम यांचे पुत्र यतीन कदम यांच्यात संघर्षाच्या ज्वाला २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासुन धुमसत आहे.

निवडणुकीतील शह-काटशह, विकासकामांचा श्रेय वाद अशी वैचारिक लढाई आजपर्यत सुरू होती. पण पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अकल्पीत अन अनाकलनीय वाद उफाळून आला. राजकारणावरून भाऊबंदकीतील धुमचक्री दिसली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee Election fight between yatin kadam and anil kadam during voting count nashik news
Market Committee Election Result: महाविकास आघाडीचा झंझावात, भुसेंना धक्का!

ग्रामपंचायत गटात परिवर्तन पॅनलचे भास्करराव बनकर हे अवघ्या तीन मतांनी शिरीष गडाख यांच्या पराभूत होत असल्याचे मतमोजणीतुन पुढे आले. पण त्याच सर्वसाधारण गटात अपक्ष उमेदवार यतीन कदम यांनी दमदार विजय मिळविला. बनकर यांच्यासाठी फेरमोजणीसाठी माजी आमदार कदम गटाकडून अर्ज आला.

यतीन कदम, सतीश मोरे यांनी फेरमोजणीवर आक्षेप घेतला. त्यावरून बाचाबाची झाली. त्याच दरम्यान माजी आमदार अनिल कदम हे तेथे आले आणि दोन्ही कदम बंधू थेट एकमेकांना भिडले. हमरीतुमरी अन थेट टोकाची भाषा दोघांमध्ये झाली. मतमोजणी दरम्यान यावेळी एकच कल्लोळ उडाला. मतमोजणी केंद्राबाहेर दोघांचे समर्थकही आक्रमक झाले.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. गर्दी विखुरण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. कदम बंधू परस्पर भिडतांनाचा हा व्हिडोओ पाहून अनेक जण अवाक झाले. राजकारणाचे वैचारिक वाद हातघाईवर आल्याने कदम घराण्यातील हा संघर्ष अधिक टोकाचा झाला असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. पोलिस व काही उपस्थितांनी मध्यस्थीकरून वाद मिटवित दोघांना दूर केले. नंतर दोघांनी एकत्र बसून या वादावर पडदाही टाकला.

Market Committee Election fight between yatin kadam and anil kadam during voting count nashik news
NMC Cat Sterilization : शहरात भटक्या मांजरांचे होणार निर्बीजीकरण; महापालिकेला सूचना

"ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर यांचा निसटत्या मतांनी पराभव होत असल्याने आमच्या प्रतिनिधीनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दिला. त्यावरून त्यांनी (यतीन कदम) यांनी विनाकारण वाद वाढविला. किरकोळ झटापट झाली असून त्या वादावर पडदा पडला आहे." - अनिल कदम, माजी आमदार.

"मी ग्रामपंचायत गटात एक हाती विजय मिळविला असताना विनाकारण फेरमतमोजणीचा आग्रह धरला जात होता. मला पराभुत करण्याचे षडयंत्र रचले जात होते. ते माझ्या अंगावर धावून आल्याने मी ही आक्रमक होत शिंगावर घेतले. पण हा वाद मिटला असून बाजार समितीत शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचे काम करणार आहे." - यतीन कदम, अपक्ष, विजयी उमेदवार.

Market Committee Election fight between yatin kadam and anil kadam during voting count nashik news
Balasaheb Thackeray Apla Dawakhana: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपला दवाखाना’चे लोकार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.