Market Committee Election : 14 बाजार समित्यांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध; आता प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रमाची

market committee election
market committee electionesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २०) प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता निवडणुकीची प्रतीक्षा असून, सहकार प्राधिकरणाकडून दोन दिवसांत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. (Market Committee Election Final voter list of 14 market committees released Now waiting for election program nashik news)

नाशिकसह १३ बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात येऊन तब्बल २० महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या दोन्ही समित्यांसह पिंपळगाव, लासलगाव, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, सिन्नर, दिंडोरी, कळवण, सुरगाणा या समित्यांच्या संचालक मंडळाची आता निवडणूक होऊ घातली आहे.

राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना उमेदवारी, तसेच मतदानाचा अधिकार देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने घेतली होती. बाजार समिती अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करणारे विधेयक सरकारने अधिवेशनात मंजूर केले.

दरम्यानच्या काळात समित्यांची सूत्रे संचालक मंडळाकडून प्रशासकाकडे गेली होती. निवडणुका घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या होत्या. अखेर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणुकांवरील स्थगिती उठवत ३० एप्रिलअखेर राज्यातील सर्वच समित्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

market committee election
Teachers Transfer: आदिवासी क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांची ZPत धडक! धोरणातील त्रुटी दूर करण्याची मागणी

या आदेशानुसार, सहकार प्राधिकरणाने मतदारयादीचा कार्यक्रम घोषित केला. २७ फेब्रुवारीला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली. यावर ८ मार्चपर्यंत हरकती नोंदविण्यात आल्या. प्राप्त झालेल्या हरकतींवर १७ मार्चपर्यंत सुनावणी प्रक्रिया पार पडली.

सर्व हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर सोमवारी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केल्यानंतर, सहकार प्राधिकरणाकडून मतदानाच्या तारखा घोषित होतील. १५ ते २० एप्रिलदरम्यान बाजार समित्यांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.

राजकीय हालचालींना वेग

अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वीचा अनुभव बघता निवडणुका तोंडावर आल्या, की स्थगित झाल्या. मात्र, यंदा न्यायालयाचे आदेश असल्याने सहकार प्राधिकरणाकडून कार्यक्रम घोषित होईल. साधारण पुढील महिन्यात मतदान होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

market committee election
Employees Strike : सकाळी थाळीनाद, सायंकाळी जल्लोष! शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.