नाशिक : जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीचे (Market Committee Election) रणशिंग फुंकले गेले आहे. जिल्ह्यातील प्रमुख लढती या महाविकास आघाडी विरुद्ध शिंदेची शिवसेना यांच्यात रंगणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. (Market Committee Election main fight will be between the Maha Vikas Aghadi and Shindes Shiv Sena nashik news )
त्यामुळे राज्यासह केंद्रात सत्ता असलेल्या भाजप या निवडणुकीत ठराविक बाजार समित्यांमध्ये रिंगणात असल्याचे दिसणार आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. शिवसेनेचे दोन गट तयार झाले असून, शिवसेना व उद्धव ठाकरे गट स्वतंत्रपणे रिंगणात असतील.
महाविकास आघाडीने एकत्रित लढावे, अशा सूचना प्रदेश पातळीवरील नेत्यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे काही तालुक्यांत महाविकास आघाडी म्हणून लढत असेल. परंतु तालुक्यांमधील वेगवेगळी राजकीय समीकरणे बघता कुठे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होण्याची शक्यता आहे.
नाशिक बाजार समितीत महाविकास आघाडीने एकत्रित लढा देण्याची तयारी केली आहे. त्याविरोधात शिंदे शिवसेना-भाजपने एकत्र येत पॅनलनिर्मिती सुरू केली आहे. दिंडोरीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन पॅनल देणार असल्याच्या हालचाली आहेत. येथे मात्र, राष्ट्रवादी अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
त्या विरोधात शिंदे शिवसेना-भाजप पॅनल देऊ शकते. कळवणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होऊ शकतो. यात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), शिंदे शिवसेना, भाजप काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. नांदगाव व मनमाड बाजार समितीत शिंदे शिवसेना भाजपला सोबत घेऊन पॅनल देणार हे निश्चित मानले जात आहे.
त्यामुळे या दोन्ही बाजार समितीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अगदी याच धर्तीवर मालेगावमध्ये लढाई होणार आहे. महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे आदेश असले, तरी येवला, पिंपळगाव बसवंत, सिन्नर येथील बाजार समित्यांमध्ये थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातच लढत होण्याची शक्यता अधिक आहे.
त्यादृष्टीने दोन्ही पक्षांकडून तयारी केली जात आहे. घोटी बाजार समितीत महाविकास आघाडी एक झाली आहे. त्या विरोधात शिंदे शिवसेनेने पॅनल उतरविण्याची तयारी केली आहे.
लासलगावचे चित्र शक्य
महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत पक्षीय राजकारण विरहित निवडणुका होण्याची शक्यता आहे. येथे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, भाजप जिल्हाध्यक्षा सुवर्णा जगताप, राष्ट्रवादीचे राजेंद्र डोखळे पॅनल उतरविण्याच्या तयारीत आहे.
चांदवड, देवळ्याचे चित्र
चांदवड व देवळा बाजार समितीत वर्चस्व असलेल्या भाजपकडून पॅनल बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. चांदवडमध्ये भाजपकडून शिंदे शिवसेनाच्या मदतीने स्वतंत्र पॅनल तयार होऊ शकतो. त्या विरोधात येथे महाविकास आघाडी एकत्र येऊन लढण्याची शक्यता आहे. देवळा बाजार समितीत भाजप स्वतंत्र पॅनल घेऊन उतरत आहे. त्याविरोधात सर्वपक्षीय एकत्र येण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.