Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारावरून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी थेट महाविकास आघाडीचे आमदार हिरामण खोसकर यांना मोबाईलवरून धमकी दिल्याची घटना घडली आहे. (Market Committee Election Shivaji Chumbhale threatened Mahavikas Aghadi MLA Hiraman Khoskar nashik news)
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शिवाजी चुंभळे यांच्यासह त्यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक कृषी बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट असे चित्र असले, तरी खरी लढत पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिकच होणार आहे. महाविकास आघाडीमुळे इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरदेखील पिंगळे गटासोबत प्रचार यंत्रणेत सहभागी झाले आहेत.
त्याचा राग मनात धरून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी आमदार खोसकर यांना मोबाइलवरून ठार करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य यांनीदेखील आमदार खोसकरांना धमकी दिली आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
‘मतदारसंघात फिरू नको, माझ्या बापाच्या नादी लागू नको, तू अजून आम्हाला ओळखले नाही. आमच्या नादी लागल्यावर काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार कर’, अशा पद्धतीने वेळोवेळी आपल्याला धमकी दिली जात असल्याचे आमदार खोसकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदिवासी संघटना रस्त्यावर उतरणार
मतदारसंघातील लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि अतिशय नम्र, शांत व संयमी असणाऱ्या लोकप्रतिनिधीला धमकी दिल्याने आदिवासी संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. चुंभळे पिता-पुत्राला अटक व्हावी, या मागणीसाठी शनिवारी (ता. २२) संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. रात्री उशिरापर्यंत पिंगळे गट, खोसकर यांचे हितचिंतक आणि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी तालुका पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.