Nashik Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राखीव जागेवर दाखल केलेले नामनिर्देशन पत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी अवैध ठरविल्याने खामखेडा येथील सरपंच वैभव पवार यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Market Committee Election Vaibhav Pawar application was also invalidated by district election officer Nashik news)
आता पवार उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करणार आहे. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातील अनुसूचित जाती-जमातीच्या राखीव जागेवर नामनिर्देशन पत्र दाखल केलेले खामखेडा (ता.देवळा) येथील लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांनी शेतकरी असल्याचा पुरावा सादर न केल्याने तालुका निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी छाननीत त्यांचे नामनिर्देशन अवैध ठरवले होते.
या निर्णयाविरोधात वैभव पवार यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७ चे नियम २७ अन्वये अपील दाखल केल्याने त्यानुसार गुरुवारी (ता.१३) अपिलाची सुनावणी झाली.
त्याचा निकाल मंगळवारी (ता.१८) रोजी प्राप्त झाला असून तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय कायम ठेवत नाशिक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैभव पवार यांचे अपील फेटाळत नामनिर्देशन नामंजूर केले. याठिकाणी वैभव पवार यांना दिलासा न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष लागून आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
देवळा बाजार समिती कार्यक्षेत्रात येणाऱ्या ३४ ग्रामपंचायतीपैकी बहुतांश ग्रामपंचायती या पेसांतर्गत येत असल्यामुळे बहुतांश ग्रामपंचायत सदस्य हे अनुसूचित जमाती या वर्गातील आहेत. बाजार समिती निवडणुकीत ग्रामपंचायत गटाच्या मतदार यादीतील पन्नास टक्के ग्रामपंचायत सदस्य अनु.जाती / जमाती या वर्गातील आहेत.
यापैकी बहुतांश सदस्यांच्या नावावर शेतीचा सात- बारा नाही, परंतु त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट असताना शेतकरी असल्याचा पुरावा नाही म्हणून त्यांना उमेदवारी करता येणार नाही या नियमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामुळे वैभव पवार यांनी केलेल्या अपिलाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून होते, मात्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखील अपील फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
"ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदार यादीत नाव असतानाही उमेदवारी अर्ज फेटाळल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून न्याय मिळेल या अपेक्षेने अपील दाखल केले होते. मात्र त्यांनीही नामनिर्देशन नामंजूर करत मला उमेदवारी पासून वंचित ठेवले आहे. या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. शासनाने कायद्यात केलेल्या बदलामुळे मतदार यादीतील मतदाराला उमेदवारी करता येत नसल्याची लोकशाहीत कदाचित ही पहिलीच घटना असावी." - वैभव पवार, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.